आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार जेलमध्ये मालीश घेतानाचा व्हिडीओ जारी केल्यानंतर भाजपाने आता आणखी एक सीसीटीव्ही शेअर केलं आहे. सत्येंद्र जैन कारागृहात जेवणाचा आस्वाद घेत असतानाचं सीसीटीव्ही भाजपाने जारी केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी हे सीसीटीव्ही ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मीडियाकडून अजून एक व्हिडीओ! बलात्काऱ्याकडून मालीश घेतल्यानंतर आणि त्याचा फिजिओ थेरपिस्ट असा उल्लेख केल्यानंतर सत्येंद्र जैन जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एखाद्या रिसॉर्ट किंवा सुट्टीवर असल्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवलं जात आहे. केजरीवालजी यांनी या हवालाबाजला शिक्षा नव्हेत तर व्हीव्हीआयपी मजा मिळेल याची खात्री केली आहे,” असं ट्वीट शेहजाद पूनावाला यांनी केलं आहे.

सत्येंद्र जैन मालीश प्रकरणाला नवं वळण, तिहार जेलमधून मोठा खुलासा, अधिकारी म्हणाले “तो फिजिओ नसून बलात्काराचा…”

व्हिडीओमध्ये सत्येंद्र जैन यांच्यासमोर जेवणाची थाळी दिसत आहे. तसंच त्यांच्या सेवेसाठी एक व्यक्ती सतत हजर असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. जेवणाची थाळी आणण्यापासून ते खुर्चीच्या शेजारी कचऱ्याचा डबा ठेवण्यापर्यंत सगळी कामं तो करत आहेत. सत्येंद्र जैन यांना तो पाण्याची बाटली देतानाही सीसीटीव्हीत दिसत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सत्येंद्र जैन यांनी आपल्याला धर्माचं पालन करायचं असल्याने त्याला साजेसं अन्न दिलं जावं अशी मागणी कोर्टात केली आहे. कोर्टाने याप्रकऱणी तिहार जेल प्रशासनाला आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. आपल्याला जैन पद्धतीचं जेवण आणि मंदिरात जाण्याची परवानगीही दिली जात नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मंदिरात गेल्याशिवाय आपण नेहमीचं अन्न खात नाही, तसंच फळं आणि सलाडचा डायट आपण पाळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

‘आप’ नेत्याच्या तुरुंगातील ‘मालीश उपचारां’वर भाजपचा आक्षेप

भाजपाने शनिवारी सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये मालीश दिली जात असल्याचा व्हिडीओ शेअऱ केल्यानंतर वाद पेटला होता. जैन यांनी व्हीआयपी वागणूक दिल्याप्रकरणी तिहार जेलचे अधीक्षक अजित कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shehzad poonawalla shared a video of aap leader satyendar jain of getting lavish meal in tihar jail sgy
First published on: 23-11-2022 at 10:23 IST