‘जयललिताविरोधी खटले : भाजपने भूमिका स्पष्ट करावी’

जयललिता यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

जयललिता यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मौन पाळले आहे, असेही रमेश म्हणाले.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारची भूमिका काय आहे, असे सर्व विचारत आहेत. मात्र जयललिता यांच्याविरुद्ध मूळ याचिका भाजपने केली आहे, असे असताना कर्नाटक सरकारच्या खांद्यावर बंदूक का ठेवण्यात येत आहे, असा सवाल रमेश यांनी केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp should speak out on appeal in jayalalithaas assets case congress