पीटीआय, बंगळुरू
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकात राजकीय संघर्ष पेटला आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपने मैसुरू, हुबळी आणि बेळगाव येथे निदर्शने केली. तर मुख्मयंत्र्यांनी भाजपची मागणी फेटाळून लावली. तसेच बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील रालोआ सरकार विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांविरोधात सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

निकालानंतर, अशा प्रकारे चौकशी करण्यास कायद्याअंतर्गत परवानगी आहे हे शोधण्यासाठी आपण कायदेतज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास मागेपुढे पाहणार नाही असे त्यांनी सांगितले.

wardha Aam Aadmi Party which helped Amar Kale win taken candidate wise stance now
आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर!…
bhandara vidhan sabha election 2024
बंडखोरांमुळे मतविभाजनाचा धोका; भंडारा, तुमसर, साकोलीत तिरंगी लढत
khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
Raigad, Dilip Bhoir expelled from BJP, Dilip Bhoir,
रायगड : दिलीप भोईर यांची भाजपातून हकालपट्टी
Wani Umarkhed constituency the concern of Mahavikas Aghadi increased Chowrangi ladhat in two places and direct fight in five constituencies
वणी, उमरखेडमध्ये महाविकास आघाडीची चिंता वाढली, दोन ठिकाणी चौरंगी तर पाच मतदारसंघात थेट लढत
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?

हेही वाचा >>>काश्मीरमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान

पत्रकार परिषदेमध्ये सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची भाजपची मागणी फेटाळताना आरोप केला की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार विरोधी पक्षाच्या राज्य सरकारांना लक्ष्य करत आहे आणि सूडाचे राजकारण करत आहे. आपल्याविरोधातील आरोप हा विरोधकांचा आपल्या सरकारविरोधातील कट असल्याचा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी करत ठिकठिकाणी निदर्शने केली. मैसुरू, हुबळी आणि बेळगाव यासह अन्य ठिकाणी निदर्शने केल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाचा निकाल पाहता सिद्धरामय्या यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि तपासात सहभागी व्हावे, अशी मागणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केली.