Premium

“चाकं असलेली बॅग डोक्यावर कशाला घ्यायची?” भाजपाकडून राहुल गांधींची खिल्ली

राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर हमालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हमालांचा शर्ट परिधान केला होता.

Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी प्रवाशाची बॅग डोक्यावर घेतली होती. (PC : Amit Malviya Twitter)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर वेळ घालवत असल्याचं चित्र अलिकडे सातत्याने पाहायला मिळत आहे. राहुल गांधी कधी ट्रक चालकांबरोबर, कधी शेतकऱ्यांबरोबर, कधी भाजी विक्रेत्यांबरोबर तर कधी छोट्या व्यापाऱ्यांबरोबर दिसतात. त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांच्या अडचणी समजून घेतात, त्यांच्याबरोबर वेळ घालवतात. राहुल गांधी यांच्या या भेटींनंतर भाजपाकडून त्यांच्यावर टीका होते. शेतकऱ्यांशी गप्पा मारताना माईक कशाला लावला? फोटोसेशन का करताय? असे प्रश्न भाजपा कार्यकर्ते सोशल मीडियावर उपस्थित करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राहुल गांधी यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी बातचीत केली. यावेळी राहुल गांधी प्रवाशाची बॅग डोक्यावर घेऊन काही अंतर चालले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, हे व्हिडीओ पाहून भाजपाने राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे.

आनंद विहार रेल्वेस्थानकावरील हमालांना भेटल्यावर राहुल गांधी यांनी हमालांचा लाल शर्ट परिधान केला, हमालांचा अधिकृत नंबर असलेला बिल्ला (बॅच) दंडावर बांधला. तसेच एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेऊन ते काही अंतर चालले. या हमालांबरोबर राहुल यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. देशातल्या सध्याच्या स्थितीवर या हमालांचं मत जाणून घेतलं. राहुल गांधी यांचे फोटो आणि आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.

हे ही वाचा >> “महिला आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा”, काँग्रेसच्या मागणीवर जेपी नड्डा म्हणाले, “२०२९ मध्ये…”

अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांनी चाकं असलेली सूटकेस डोक्यावर घेतल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. मालवीय यांनी म्हटलं आहे की राहुल गांधींसारखा मंद माणूसच अशी सूटकेस डोक्यावर घेऊन जाईल. ते रेल्वे स्थानकावर गेले नसतीलच. कारण प्रवाशांच्या आणि हमालांच्या सोयीसाठी तिथे सरकते जिने आणि रॅम्प आहेत. राहुल गांधी यांचं हे सगळं एक नाटक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp trolls rahul gandhi meeting coolie in delhi why carrying suitcase with wheels on head asc

First published on: 21-09-2023 at 15:58 IST
Next Story
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!