BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा ( BJP Worker ) मृतदेह कार्यालयाच्या आत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली असून तिने हे मान्य केलं आहे की धारदार शस्त्रांनी तिने या कार्यकर्त्यावर ( BJP Worker ) वार केले. या प्रकरणात या महिलेने ही कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

कुठे घडली ही घटना?

भाजपा कार्यकर्त्याचा ( BJP Worker ) मृतदेह भाजपा कार्यालयाच्या आत सापडल्याची ही घटना पश्चिम बंगाल येथील २४ परगणा जिल्ह्याती उस्थी या ठिकाणी घडली आहे. पृथ्वीराज नासक असं या हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं ( BJP Worker ) नाव आहे. जिल्ह्यातील भाजपाची सोशल मीडिया अकाऊंट सांभाळण्याचं काम पृथ्वीराजकडे होतं. या प्रकरणात महिलेला अटक झाल्यानंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर पु्न्हा एकदा आरोप केला आहे.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

नेमकी काय घटना घडली?

पृथ्वीराज नासकर या भाजपा कार्यकर्त्याचा ( BJP Worker ) मृतदेह भाजपाच्या कार्यालयाच्या आतल्या बाजूला शुक्रवारी रात्री आढळून आला. पृथ्वीराज हे त्यांच्या घरातून ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे. यानंतर या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेने धारदार शस्त्रांनी पृथ्वीराज नासकर यांची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. आम्ही सदर महिलेची चौकशी करतो आहोत. पृथ्वीराज नासकर आणि या महिलेचे काही प्रेमसंबंध होते का? किंवा त्यांच्यात काही वाद झाला आणि तो विकोपाला जाऊन ही घटना घडली का? या पैलूंचा आम्ही तपास करत आहोत असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं.

हे पण वाचा- ‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

पोलिसांनी काय सांगितलं?

आम्ही मोबाइल फोन, त्या ठिकाणी असलेलं सीसीटीव्ही फुटेज या अनुषंगानेही तपास करत आहोत. तसंच महिलेला या पृथ्वीराज नासकरची हत्या करण्यासाठी कुणी चिथावलं होतं का? हा पैलूही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगानेही आमचा तपास सुरु आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. आम्ही जेव्हा घटनास्थळी गेलो तेव्हा आमच्या पथकाने कार्यालयाचं समोरचं गेट तोडलं. कारण ते आतल्या बाजूने बंद होतं. महिलेने हत्या केली आणि ती मागच्या दरवाजाने पळून गेली असं घडलेलं असू शकतं असंही पोलीस म्हणाले. मात्र या महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिची चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी आणखी काय माहिती दिली?

या प्रकरणात ज्या महिलेला अटक करण्यात आली आहे तिने पृथ्वीराज नासकर ( BJP Worker ) यांची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. पोलीस या महिलेची चौकशी करत आहेत. दुसरीकडे भाजपाने या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आऱोप केला आहे. भाजपाच्या पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्ष सुखंता मजुमदार यांनी या पृथ्वीराज नासकर हत्या प्रकरणामागे तृणमूलचा हात आहे हा आरोप केला आहे.

Story img Loader