१५ व्या लोकसभेच सूप शुक्रवारी वाजल़े त्यामुळे संसदीय शह-काटशहाच्या राजकारणाला तूर्त विराम मिळाला आह़े आता लढत आहे ती थेट मैदानातच! लोकसभा निवडणुकांचे हे मैदान आता दोन महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपले आह़े प्रचाराचा धुरळा उसळायला आधीच सुरुवात झाली आह़े आता त्याला अधिक रंगत येणार आह़े शर्यतीत धावणारे कोण आणि नुसत्या टाळ्या पिटणारे कोण, याच्या निवडीचा हा टप्पा आह़े पक्ष कोणताही असो निवडणुकांचा रंग तर प्रत्येकाला चढू लागला आह़े
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक येत्या २७ फेब्रुवारी रोजी येथे होणार आह़े बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा होणार आह़े त्यामुळे बैठकीनंतर पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी ट्विप्पणी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी केली आह़े
या बैठकीत लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी आदी अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत़ चर्चेनंतर उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पहिल्या बैठकीत निर्विवादास्पद जागांवर आणि पक्षातील बडय़ा नेत्यांच्या जागांवर उमेदवार घोषित करण्यात येतील़
तसेच निवडणुकांना दोनच महिने उरल्याने आम्ही २७२हून अधिक जागा जिंकण्याच्या अधिक जवळ आहेात आणि युतीचा आणखीही विस्तार होण्याची शक्यता आहे, असेही जेटली यांनी म्हटले आह़े