भाजपा आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल(रविवार) पुन्हा एकदा निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहीमेवरून राहुल गांधी यांन भाजपावर टीका केली होती. ज्यास आज भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

“जम्मू-काश्मीरला रोजगार, चांगला व्यवसाय आणि प्रेम हवे होते, परंतु त्यांना मिळालं काय? भाजपाचा बुलडोजर! अनेक दशकांपासून जी जमीन तिथल्या लोकांनी कष्टाने कसली, ती त्यांच्याकडून हिसकावून घेतली जात आहे. लोकांमध्ये फूट पाडून नव्हे तर एकत्र येऊन शांतात आणि काश्मिरीयतचे रक्षण होईल.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
INDIA bloc collapse in Kashmir complete NC PDP fielded candidates against each other
काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे ‘तीनतेरा’; NC, PDP ने एकमेकांविरोधात दिले उमेदवार
janardhan reddy return to bjp
खाण घोटाळाप्रकरणी नऊ गुन्हे दाखल असलेल्या माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश; यामागचं राजकारण काय?
Himanta Biswa Sarma slams rahul gandhi
‘राहुल गांधी आईचं ऐकत नाही आणि सोनिया गांधीही त्यांना घाबरतात’, हिमंता बिस्वा सरमांचा आरोप

ज्यावर आज भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, “जम्मू काश्मीर मध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे पण राहुल गांधींचं पोट दुखावं? एवढे वर्ष काश्मीरला राजकारणासाठी अंधारात कोंडून ठेवलं, आणि आता विकासाची पहाट पण बघवेना? आता तरी विकासाची भूमिका घ्या.”

काँग्रेस-पीडीपीसह अन्य पक्षांकडूनही विरोध –

काँग्रेस,पीडीपीसह अनेक मोठ्या पक्षांनी या अतिक्रमण विरोधी मोहीमेवरून चिंता व्यक्त केली आहे. याचबरोबर हे तत्काळ थांबण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाचे आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी ७ जानेवारी रोजी सर्व उपायुक्तांना सरकारी जमिनींवरील अतिक्रमण १०० टक्के हटवण्याचे निर्देश होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील मोठ्याप्रमाणावरील जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहे.