परदेशी बँकांमध्ये असलेला  ‘बेहिशेबी काळा पैसा‘ परत आणण्याला आपले सरकार पहिले प्राधान्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-२० परिषदेपूर्वी सांगितले. सर्व देशांनी मिळून यासाठी प्रयत्न करावे आणि भारतास सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर अनऔपचारिक बैठकीमध्ये मोदींनी काळया पैशांचा मुद्दा उपस्थित केला. जी-२० संघटनेमध्ये  जगातील 20 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत त्यांनी जागतिक विकास दर वाढीसाठी निर्णय घेतला असून एकूणच २ टक्के जागतिक विकास दर वाढविण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. जागतिक समन्वयाच्या माध्यमातून काळा पैसा परत आणण्याचे उद्दिष्टय साध्य होऊ शकते असे मोदी म्हणाले.  बेहिशोबी काळापैसा हा देशांच्या सुरक्षेसाठीही एक आव्हान असल्याचे मोदी म्हणाले.