नेदरलँडच्या राजकुमारी कॅथरिना अमलिया आणि २० वर्षीय राजकुमारी अलेक्सिया यांच्यावर हल्ला होणार होता. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना हा संशय आहे की हा आरोपी नाझी विचारधारा मानणारा आहे. या कटामागे नेमका हेतू काय होता? हे अद्याप समजू शकलेलं नाही. ‘द हेग लोक’ ने दिलेल्या माहितीनुसार आरोपीला आता सोमवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

आरोपीकडे सापडल्या दोन कुऱ्हाडी

द हेग या ठिकाणाहून या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडे दोन कुऱ्हाडी होत्या, ज्यापैकी एका अलेक्सिया आणि मोसाद अशी दोन नावं त्या कुऱ्हाडींवर लिहिलेली आहेत. नाझी काळातील सीग हेल हे निशाणही त्याच्यावर कोरलं होतं. तसंच पोलिसांना संशयित आरोपीने लिहिलेली एक सुसाईड नोटही मिळाली आहे. ज्यावर दोन्ही राजकुमारींची नावं आणि ब्लडबाथ असं लिहिलं होतं.

आरोपीबाबत काय माहिती समोर आली?

नेदरलँड या ठिकाणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दोन डच राजकुमारींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे.

आरोपीकडे दोन कुऱ्हाडी सापडल्या आहेत, त्यावर दोन आपत्तीजनक शब्द लिहिले आहेत. त्यात नाझी अभिवादनही लिहिलं आहे.

आरोपी ३३ वर्षांचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याचं नाव काय ते सांगितलेलं नाही.

२०२० एका व्यक्तीने राजकुमारी अमालियाला बलात्कार आणि हत्येची धमकी दिली होती. ज्यानंतर तिने देश सोडला होता.

राजकुमारी अमानियाला ड्रग कार्टेलकडून धोका होता त्यामुळे तिने नेदरलँड सोडलं होतं आणि एक वर्ष ती माद्रीदमध्ये राहिली होती.

राजकुमारी अमालिया विरोधात याआधीही रचला गेला कट

राजकुमारी अमालिया ही भविष्यातली राणी आहे. तिच्याविरोधात याआधी कट रचला गेल्याची घटना घडली आहे. ड्रग्ज माफियांवर अमालिया आणि माजी पंतप्रधान मार्क रुट यांच्या अपहरणाचा कट रचल्याचा आरोप आहे. रिदुआन ताघी हा एकेकाळी युरोपमधला कुख्यात ड्रग तस्कर होता, त्यानेही राजकुमारी अमालियाविरोधात कट रचला होता.त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर २०२४ ध्ये मारेन्गो या ठिकाणी चाललेल्या एका खटल्यात पाच हत्यांच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ताघीने तीन हत्यांचा कट रचला होता. एक वकील, एक टीव्ही पत्रकार, एका साक्षीदाराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता, ज्यानंतर त्याला अटक झाली.

Dutch princesses targeted in sinister murder plot as suspect found with axes
डच राजकुमारींच्या हत्येचा कट उघड, एका आरोपीला अटक (फोटो-सोशल मीडिया)

माझ्या मुली आता सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर पडू शकत नाहीत. त्यांचं स्वातंत्र्या या धमक्यांमुळे हिरावलं गेलं आहे.”

राणी मॅक्सिमा

अमालियाला सोडावं लागलं होतं हॉस्टेल

सुरक्षेच्या कारणास्तव २०२२ मध्ये त्यांना अॅमस्टर्डम येथील त्यांचं हॉस्टेलही सोडावं लागलं होतं. त्यानंतर द हेग च्या महालात ती राहू लागली होती. २०२४ मध्ये राजकुमारी अमालियाने स्पेनच्या माद्रीद या ठिकाणी तिचं शिक्षण पूर्ण केलं. तिथे ती आहे याची कल्पना फार कुणाला नव्हती. सुरक्षेच्या कारणास्तव जो त्रास होतो त्यावर स्पष्ट भाष्य केलं. तिने सांगितलं की मला एक सामान्य व्यक्तीप्रमाणे, विद्यार्थिनीप्रमाणे जगायला आवडतं. मला मी विद्यार्थिनी होते ते कायमच आठवतं. मला रस्त्यावर फिरायला आणि दुकानात खरेदीसाठी जाणं आवडतं. राणी मॅक्सिमा ही तिची आई आहे. त्यांनी सांगितलं की ज्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळे तिच्या आयुष्यावर बराच परिणाम झाला आहे. आता ती तिच्या मर्जीने बाहेर जाऊ शकत नाही. प्रिन्सेस कॅथरिना-अमालियाला प्रिन्सेस ऑरेंज ही पदवी देण्यात आली आहे. २०२४ मध्ये ती घरी परतली, त्यानंतर सुरक्षेचे कठोर निर्बंध हे लादले गेले होते.

सोमवारपासून प्रकरणाची सुनावणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होणार आहे. आरोपीला फेब्रुवारी महिन्यातच अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गोपनीय ठेवण्यात आलं होतं. आता हे प्रकरण समोर आलं आहे. या कटामागे काय कारण होतं ते अजून समोर आलेलं नाही.

कोण आहेत राजकुमारी अमालिया आणि अॅलेक्सिया?

२२ वर्षीय राजकुमारी कॅथरिना अमालिया आणि राजकुमारी अॅलेक्सिया सख्ख्या बहिणी आहेत.

राजा विल्यम आलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांच्या या दोन मुली आहेत.

अमालिया ही डच राजघराण्यातील सिंहासनाची उत्तराधिकारी आहे. ती तिच्या साध्या स्वभावासाठी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.

अॅलेक्सिया राज्याची दुसरी उत्तराधिकारी आहेत. दोघीही डच राजघराण्याच्या सक्रिय सदस्य आहेत.