Influencer Carol Acosta dies in US after choking On food : अमेरिकेती न्यूयॉर्क येथे कॅरोल अकोस्टा (Carol Acosta) या २७ वर्षीय बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएन्सरचा रेस्टॉरंटमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर जेवण करत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घशात घास अडकून गुदमरल्यामुळे सोशल मीडियावर किलाडामेंटे (Killadamente) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅरोलचा मृत्यू झाल्याचे माहिती मिळत आहे. तिच्या निधानाची माहिती तिची लहान बहीण खात्यान (Khatyan) हिने इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.

“मी तुझ्यावर प्रेम करते आणि कायम करत राहिन. मी देवाचे आभार व्यक्त करते की त्याने मला तुझ्यासारखं मोठं हृदय असलेली बहिण दिली. माझ्या बहि‍णीला शांती लाभो”. अशी पोस्ट तीने केली आहे. या दु:खद घटनेनंतर तिने अकोस्टाच्या चाहत्यांचेहीआणि तिच्या सोशल मीडिया फॉलेअर्सचे देखील आभार मानले आहेत.

Accidents caused by protection or hunting of wild boars in Palghar taluka
शहरबात : रानडुक्कर आणि दुर्घटना
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
coastal road girl death loksatta
मुंबई : ‘कोस्टल रोड’ अपघातात तरुणीचा मृत्यू
Pandharinath Sawant was cremated at Bhoiwada crematorium in Mumbai.
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
Anna Beatriz Pereira Alves dies
ॲडल्ट चित्रपटाचं शूटिंग करताना घडली भयंकर घटना, हॉटेलच्या बाल्कनीतून कोसळून २७ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू

हेही वाचा>> “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप

अकोस्टाच्या कुटुंबियांनी देखील या घटनेनंतर अधिकृत निवेदन जारी करत माहिती दिली आहे. “३ जानेवारी रोजी किलाडामेंटे म्हणून ओळखली जाणाऱ्या आमच्या प्रिय कॅरोलचे निधन झाले. अकोस्टा गोन्झालेझ कुटुंब तिला ओळखणाऱ्या प्रत्येकाबरोबर आपले दु:ख शेअर करते.” तसेच या निवेदनात अकोस्टाने केलेल्या सामजिक कार्याबद्दल तिचे कौतुक करण्यात आले आहे. तिने आपल्या कामाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जिवनावर प्रभाव टाकल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा>> “म्हणून मी केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा…

इंस्टाग्रामवर ६.७ मीलियन फॉलोअर्स असणाऱ्या किलाडामेंटेने आपली वेगळी ओळख तयार केली होती. ती फॅशन, लाइफस्टाइल आणि मातृत्व यासंबंधी व्हिडीओ तयार करत असे. ती आपल्या दैनंदिन अडचणी आणि संघर्ष आपल्या फॉलोअर्सबरोबर शेअर करत असे. याबरोबरच तिने आपल्या नैराश्य आणि चिंता याविरोधातील लढा देखील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला होता.

Story img Loader