रमझानच्या सणाला सुरूवात

आशियातील बहुसंख्य मुस्लीमांनी बुधवारपासून पवित्र रमझानचा सण पाळण्यास सुरूवात केली आहे. जवळपास महिनाभर हा सण साजरा केला जाणार असून इदने त्याची सांगता होणार आहे.

आशियातील बहुसंख्य मुस्लीमांनी बुधवारपासून पवित्र रमझानचा सण पाळण्यास सुरूवात केली आहे. जवळपास महिनाभर हा सण साजरा केला जाणार असून इदने त्याची सांगता होणार आहे. मात्र युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने रमझानच्या सणाला गालबोट लागले.
अफगाणिस्तानातील हेलमंड प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी रस्त्यालगत पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडविला त्यामध्ये तीन नागरिक ठार झाले. इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमझानचे सोयरसुतक दहशतवाद्यांना नसल्याचे त्यावरून स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानात गेल्या २४ तासात करण्यात आलेल्या कारवाईत दोन डझन बंडखोर ठार झाल्याचे अंतर्गत मंत्रालयाने सांगितले. फिलिपाइन्सच्या दक्षिणेकडील भागांत मुस्लीम बंडखोर आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीमुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
आशियातील भारत आणि पाकिस्तानसारख्या मुस्लीमबहुल देशांमध्ये अद्याप रमझानच्या सणाला सुरूवात झालेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bomb blast in afghanistan