scorecardresearch

बॉम्बसह भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेला तरुण अन्…; झारखंडमधील खळबळजनक घटना

झारखंडमधील धनबाद येथील बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

बॉम्बसह भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेला तरुण अन्…; झारखंडमधील खळबळजनक घटना
संग्रहित फोटो- पीटीआय

झारखंडमधील धनबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीच्या डिक्कीत हा स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. एक तरुण दुचाकीच्या डिक्कीत बॉम्ब घेऊन भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात आला होता. यावेळी बाजारात स्फोट घडला.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, एक तरुण दुचाकीच्या डिक्कीत बॉम्ब घेऊन बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी झालेल्या स्फोटात एका तरुणासह तीन भाजी विक्रेते गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना शहरातील शहीद निर्मल महातो वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर उपचार केले जात आहे.

हेही वाचा- हृदयद्रावक: फिफा विश्वचषकाचा आनंद क्षणात विरला, मुंबईत पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा अंत

बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी संबंधित परिसर सील केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 20:26 IST

संबंधित बातम्या