scorecardresearch

काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट, आठ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी

सुन्नी मुस्लिम दहशतवादी गट इस्लामिक स्टटने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

Afghanistan Kabul Blast
सुन्नी मुस्लिम दहशतवादी गट इस्लामिक स्टटने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी (Photo: Reuters)

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाले आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी शनिवारी रात्री हा स्फोट झाला. अल्पसंख्यांक शिया मुस्लिमांची या ठिकाणी नेहमी बैठक पार पडायचयी. सुन्नी मुस्लिम दहशतवादी गट ‘इस्लामिक स्टेट’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी हा स्फोट आपण घडवून आणल्याचा दावा केला आहे.

खासगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण जखमी आहेत. स्फोटानंतर तपास पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं, असं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये बसस्थानकाजवळ असणाऱ्या या ठिकाणी रुग्णवाहिका दिसत होत्या.

प्रेषित मोहम्मद यांचे नातू हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ पार पडणाऱ्या आशुरापूर्वी हा हल्ला करण्यात आला. याआधी शुक्रवारी इस्लामिक स्टेटने केलेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू आणि १८ जखमी झाले होते. अफगाणिस्तानमधील कोणत्याही ठिकाणी इस्लामिक स्टेटचं नियंत्रण नाही, मात्र स्लीपर सेलच्या माध्यमातून ते अल्पसंख्यांवर हल्ला करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-08-2022 at 08:25 IST
ताज्या बातम्या