scorecardresearch

चंडीगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडनजीक बॉम्ब

सोमवारी येथे पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसाठी वापरलेल्या ‘हेलिपॅड’पासून काहीशे मीटरवर जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी तातडीने रवाना झाले.

चंडीगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडनजीक बॉम्ब
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, चंडीगड

सोमवारी येथे पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसाठी वापरलेल्या ‘हेलिपॅड’पासून काहीशे मीटरवर जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी तातडीने रवाना झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ‘हेलिपॅड’पासून सुमारे एक किलोमीटरवर व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या अधिकृत निवासस्थानापासून सुमारे दोन किलोमीटरवरील नायगाव-कन्सल रस्त्यावरील शेतात हा बॉम्ब सापडला.

घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, पोलीस नियंत्रण कक्षाला कंसल आणि नायगाव रस्ते जेथे जुळतात त्या भागात बॉम्बसदृश वस्तू दिसल्याचा संदेश मिळाला. जेव्हा आम्ही ती वस्तू तपासली तेव्हा तो जिवंत बाँब असल्याचे आढळले, हा परिसर तातडीने निर्मनुष्य करण्यात आला आहे. हा बाँब घटनास्थळी कसा आला, याचा तपास केला जाईल.

पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने हा बाँब एका ड्रममध्ये ठेवून ते वाळूच्या पिशव्यांनी झाकण्यात आले असून, लष्कराला सतर्क करण्यात आले आहे. लष्कराचे अधिकारी पुढील कारवाई करतील. अधिकाऱ्याने सांगितले, की यापूर्वीही येथे टाकून दिलेली निकामी बाँब कवच सापडली आहेत. भंगार विक्रेते येथे ही कवच टाकून देत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 01:53 IST

संबंधित बातम्या