scorecardresearch

Premium

बोरिस जॉन्सन यांच्याकडून पार्लमेंटची जाणीवपूर्वक दिशाभूल! ब्रिटनच्या पार्लमेंटच्या सर्वपक्षीय समितीचा अहवाल

समितीचे सदस्य आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत, असा आरोप करून त्यांनी काहीच दिवसांपूर्वी खासदारकीचा राजीनामा दिला.

uk committee report on boris johnson
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन

लंडन :ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी मेजवान्या आयोजित केल्याप्रकरणी पार्लमेंटसमोर जाणीवपूर्वक असत्य कथन केल्याचा ठपका सर्वपक्षीय समितीने ठेवला.

करोनाकाळात लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करून या मेजवान्या आयोजित केल्या होत्या याची आपल्याला कल्पना नव्हती, असे जॉन्सन यांनी ब्रिटनच्या संसदेला सांगितले होते. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक संसदेची दिशाभूल केली, असे संसदीय समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले.

sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान
ajit-pawar
“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडे, आता नेत्यांनी ठरवावं…”, बाबा सिद्दीकींच्या पक्षप्रवेशावर अजित पवारांचे सूचक विधान
hemant soren
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार? सोरेन यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; रांचीमध्ये जमले झारखंडचे मंत्रिमंडळ
PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”

जॉन्सन यांनी पार्लमेंटच्या नियमांचा भंग केला आणि तसेच ते सचोटीने वागले नाहीत, अशी कठोर टीका अहवालात करण्यात आली आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस समितीने केली आहे. मात्र, समितीचे सदस्य आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत, असा आरोप करून त्यांनी काहीच दिवसांपूर्वी खासदारकीचा राजीनामा दिला.

ब्रिटनमध्ये आणि संपूर्ण जगभरात करोनाची महासाथ असताना, २०२० आणि २०२१ साली, १० डाऊिनग स्ट्रीट येथे मेजवान्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. ब्रिटनच्या कोणत्याही पंतप्रधानांनी हाऊस ऑफ कॉमन्सची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा प्रसंग घडलेला नाही. संसद आणि जनतेसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या विषयावर जॉन्सन यांनी वारंवार असत्य कथन केले, असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालात काय नमूद करण्यात आले?

जॉन्सन यांनी पार्लमेंटची दिशाभूल करून गंभीर गुन्हा केला आहे. सरकारचे सर्वात वरिष्ठ सदस्य असलेल्या पंतप्रधानांनी हा गुन्हा केल्यामुळे त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे अशक्य आहे. रिकॉल ऑफ एमपीज अ‍ॅक्टच्या (खासदारांना परत बोलावण्याचा अधिकार) तरतुदींचा वापर करून त्यांना दीर्घकाळ निलंबित ठेवण्याची शिफारस करण्यावर आमची सहमती झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boris johnson deliberately misled parliament uk committee report zws

First published on: 16-06-2023 at 05:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×