धक्कादायक! करोना लस घेतली नाही म्हणून हॉस्पिटलचा हृदय प्रत्यारोपण करण्यास नकार

रुग्णालयाच्या भूमिकेवर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

(फोटो – एपी)

एका रुग्णानं करोनाची लस घेण्याचं नकार दिल्यानं त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याचा दावा रुग्णाच्या कुटुंबीयांना केला आहे. त्यानंतर बोस्टनचे एक हॉस्पिटल स्वतःचा बचाव करत करण्यासाठी त्यांची भूमिका मांडत आहे. देशभरातील बहुतेक प्रत्यारोपण कार्यक्रम रुग्णांच्या जगण्याची शक्यता सुधारण्यासाठी समान अटी ठेवतात, असं या रुग्णालयाने म्हटलंय.

३१ वर्षीय डीजे फर्ग्युसन या रुग्णाने करोनाची लस घेतली नसल्याने तो या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र नाही, असं रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. असा दावा रुग्णाच्या कुटुंबाने या आठवड्यात एका क्राउडफंडिंग अपीलमध्ये केलाय. “हे अत्यंत संवेदनशील असून आम्हाला काहीच कळत नाहीये. हा केवळ राजकीय मुद्दा नाही. लोकांना पर्याय हवाच!,” असं कुटुंबानं म्हटलंय. त्यांनी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून रुग्णाच्या उपचारासाठी हजारो डॉलर्स जमा केले आहेत.

डीजेची आई, ट्रेसी फर्ग्युसन म्हणाल्या, की त्यांचा मुलगा लसीकरणाच्या विरोधात नाही. परंतु एका नर्सने बुधवारी सांगितले, की त्याला अॅट्रियल फायब्रिलेशन आहे. ज्यामध्ये हृदयाची हालचाल अनियमित होत असून बर्‍याचदा त्याचे हृदय जलद गतीने कार्य करते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला करोनाच्या लसीमुळे दुष्परिमाण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर त्याचे त्याच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, याची खात्री रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना डॉक्टरांकडून हवी आहे.

दरम्यान, ब्रिघम आणि महिला रुग्णालयाने रुग्णाच्या गोपनीयता कायद्यांचा हवाला देऊन डीजे फर्ग्युसनच्या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. परंतु त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या प्रतिसादाकडे लक्ष वेधले, ज्यामध्ये म्हटलंय की करोना लस ही फ्लू शॉट आणि हिपॅटायटीस बी लसींसह बहुतेक यूएस ट्रान्सप्लांट प्रोग्रामसाठी आवश्यक असलेल्या अनेक लसीकरणांपैकी एक आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की ज्यांचं हृदय प्रत्यारोपण केलं जातंय त्या रुग्णांनी करोना लस घेतली नसेल, तर जास्त धोका असतो. त्यांची धोरणे अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रान्सप्लांटेशन आणि इतर आरोग्य संस्थांच्या शिफारशींनुसार आहेत, असंही रुग्णालयाने म्हटलंय.

“सध्या अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत १ लाखांपेक्षा जास्त लोक आहे. आणि उपलब्ध अवयवांची कमतरता आहे. या यादीतील सुमारे अर्ध्या लोकांना पुढच्या पाच वर्षांतही अवयव मिळणार नाहीत,” असे रुग्णालयाने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boston hospital denies heart transplant to patient who refused to get vaccinated against covid 19 hrc

Next Story
मोदी सरकारकडून दिरंगाई? एअर इंडिया टाटांकडे सुपूर्द करण्याचा दिवस चुकवला, आता…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी