आफ्रिकी मुलाला सूटकेसमध्ये टाकून स्पेनमध्ये नेल्याचे उघड

आफ्रिकेच्या एका मुलाला सूटकेसमधून लपवून त्याला स्पेनची सीमा ओलांडून नेण्यात आले असताना ती बाब उघड झाली.

आफ्रिकेच्या एका मुलाला सूटकेसमधून लपवून त्याला स्पेनची सीमा ओलांडून नेण्यात आले असताना ती बाब उघड झाली. आता त्या मुलाला तात्पुरता आश्रय देण्यात आला असून नंतर त्याला आईच्या ताब्यात दिले जाईल असे सांगण्यात आले.
उत्तर आफ्रिकेतील दोन स्पॅनिश वसाहतीतील सेऊटा येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी तपासणी केली असता सूटकेसमध्ये आठ वर्षांचा मुलगा सापडला, त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळण्यात आले होते. ही घटना ७ मे रोजी घडली, सूटकेसमध्ये ठेवले असता त्याला श्वास घेण्यासाठीही जागा नव्हती. एकोणीस वर्षांची एक महिला पायी सीमा ओलांडत असताना तिच्या हातात ही सूटकेस होती. तिची ओळख जाहीर करण्यात आली नाही. सीमा सुरक्षा स्कॅनर्सना सूटकेसमध्ये मुलगा असल्याचे दिसले. ही अतिशय धक्कादायक घटना असली तरी अनेक स्थलांतरित युरोपमध्ये चांगले जीवनमान मिळेल या आशेने असे प्रकार करीत असतात. या मुलाचे वडील अली क्वातारा यांना सीमा ओलांडताना अटक करण्यात आली. हा माणूस आयव्हरी कोसट येथील असून तो मुलाच्या आईबरोबर कायदेशीररीत्या स्पेनच्या कॅनरी आयलंड येथे राहत होता पण मुलाला मात्र तेथे आणण्यास परवानगी नव्हती. कारण त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी होते.
स्थलांतर अधिकाऱ्यांनी मुलाला एक वर्ष स्पेनमध्ये राहण्यास काही वेगळ्या कारणांसाठी परवानगी दिली असून, सेऊटा येथील केंद्रात हा मुलगा राहत असून न्यायाधीशांनी डीएनए चाचणीचे आदेश दिले असल्याने ती चाचणी झाल्यानंतर खातरजमा करून त्याला आईच्या ताब्यात दिले जाईल. स्पेनच्या न्यायालयाने म्हटले आहे की, मुलाच्या वडिलांना चौकशी संपेपर्यंत तुरुंगातच रहावे लागेल. अली ओटारा यांचे वकील जुआन इसिद्रो फर्नाडेझ डायझ यांनी सांगितले की, आमच्या अशिलास सूटकेसमधून मुलगा नेला जात आहे हे माहिती नव्हते. आयव्हरी कोस्टच्या पासपोर्टवर सीमा ओलांडता येईल असे त्यांना वाटले. मोरोक्को, मेलिलाच्या सीमेलगत असलेल्या स्पॅनिश भागात तसेच सेऊटा येथे अनेक स्थलांतरित लोक युरोपातील चांगल्या जीवनाच्या आशेने प्रवेश करत असतात त्यासाठी ते जीव धोक्यात घालतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Boy smuggled to spain in suitcase

ताज्या बातम्या