ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बुधवारी येथील आयएनएस तरकश या युद्धनौकेवरून गोव्याच्या सागरात घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० कि.मी. आहे.
पूर्वनिर्धारित मार्गाने जाऊन या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केला. रशियन बनावटीच्या युद्धनौकेवरून सकाळी अकरा वाजता हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले असे ब्राह्मोस एरोस्पेसचे प्रमुख ए. शिवथानू पिल्ले यांनी सांगितले.
आयएनएस तरकश ही तलवार वर्गातील युद्धनौका असून ती ९ नोव्हेंबरला कार्यान्वित करण्यात आली आहे. भारत व रशिया यांच्यात जुलै २००६मध्ये आठ हजार कोटी रुपयांचा एक करार झाला असून, त्याअंतर्गत ज्या युद्धनौका बांधण्यात आल्या, त्यात आयएनएस तरकश, आयएनएस तेग व आयएनएस त्रिखंड यांचा समावेश आहे. आयएनएस तेग ही युद्धनौका २७ एप्रिल २०१२ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. आयएनएस त्रिखंड ही युद्धनौका लवकरच कार्यान्वित केली जाईल. आयएनएस तरकश वरून जमिनीवरून हवेत, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे. १०० एमएम मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो टय़ूब्ज, पाणबुडीविरोधी अग्निबाण सोडता येतात. या तीनही युद्ध नौकांवर आठ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे लावली आहेत.

ब्राम्होस क्षेपणास्त्र
ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत व रशिया यांनी संयुक्तपणे तयार केले असून त्याच्या मदतीने ३०० किलोचे युद्धास्त्र सोडता येते. हे क्षेपणास्त्र २.८ मॅक (ध्वनीच्या वेगाच्या २.८ पट) वेगाने प्रवास करते. जमिनीवरून हल्ले, जहाजविरोधी हल्ले व पाणबुडीवरून हल्ले यासाठी या क्षेपणास्त्राच्या वेगवेगळय़ा आवृत्त्या विकसित करण्यात येत आहेत.

Israel succeeded in preventing an unexpected attack by Iran
इराणचा अनपेक्षित हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी; इराणनी सोडलेली ३०० हून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
bhiwandi highway robber marathi news
भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड