कौतुकास्पद! ब्रेन डेड असूनही विद्यार्थ्याने वाचवले सात जणांचे प्राण; आरोग्यमंत्र्यांनी अंत्यसंस्काराला लावली हजेरी

नेवीसचं ह्रदय, हात, डोळे, कि़डनी आणि फुफ्फुस गरजू रुग्णांना देण्यात आलं

Brain Dead, Kerala, Navis
नेवीसचं ह्रदय, हात, डोळे, कि़डनी आणि फुफ्फुस गरजू रुग्णांना देण्यात आलं

ब्रेन डेड विद्यार्थ्याच्या अवयदानामुळे सात लोकांना जीवनदान मिळालं आहे. २५ वर्षीय नेवीस अकाऊंट्समध्ये मास्टर डिग्री करत होता. फ्रान्समधून शिक्षण घेणारा नेवीस करोनामुळे केरळमधील आपल्या घरातूनच ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करत होता. ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना त्याचे अवयव दान करण्याची इच्छा नव्हती. मात्र नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आणि यामुळे सात लोकांचा जीव वाचला.

१८ सप्टेंबरला नेवीस आपल्या नेहमीच्या वेळी उठला नाही म्हणून त्याची छोटी बहीण त्याला जागं करण्यासाठी गेली. मात्र नेवीस झोपेतून उठतच नव्हता. यावेळी त्याचा श्वास घेत होता. कुटुंबाने तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी नेवीसच्या शरिरातील सारखेचं प्रमाण खूप कमी झाल्याचं कुटुंबाला सांगितलं. प्रकृतीत सुधारण होत नसल्याने २० सप्टेंबरला त्याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.

चार दिवसांनी नेवीसला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. यानंतर त्याचे वडील आणि कुटुंबाने अवयवदान करण्याची तयारी दर्शवली. नेवीसचं ह्रदय, हात, डोळे, कि़डनी आणि फुफ्फुस गरजू रुग्णांना देण्यात आलं. केरळचे आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी नवीसच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली तसंच राज्य सरकारच्या वतीने आभार मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Brain dead kerala student becomes organ donor sgy

ताज्या बातम्या