ब्राझीलमध्ये सध्या राजकीय अराजकतेचे वातावरण दिसत आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी राजधानी ब्रासिलियामध्ये खूप गोंधळ घातला. नवे राष्ट्रपती लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांनी पदाची शपथ घेण्याविरोधात बोल्सोनारो यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन हिसंक बनले असून आंदोलकांनी ब्राझीलच्या संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला आहे. पोलिसांनी देखील तत्काळ कारवाई करत सरकारी इमारतीमध्ये घुसलेल्या ४०० आंदोलकांना अटक केली आहे.

ब्राझीलमध्ये वातावरण का तापलं

ऑक्टोबर महिन्यात ब्राझीलमध्ये निवडणूक पार परडली. या निवडणुकीत बोल्सोनारो यांना पराभवाचा सामना करावा लागला. लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला विजय मिळाला. लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांनी तिसऱ्यांदा ब्राझीलचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मात्र शपथविधी झाल्यानंतर बोल्सोनारो यांचे समर्थक निवडणुकीचा निकाल मान्य करायला तयार नाहीत. हजारो समर्थक रस्त्यांवर उतरले असून रविवारी सुरक्षा व्यवस्थेचं कडं तोडून संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टात समर्थक घुसले आणि त्यांनी तोडफोड व इतर नकुसान केले. या आंदोलनात संसद भवनाचे दरवाजे, खिडक्या मोठ्या प्रमाणावर तोडल्या गेल्या. पोलिसांनी यावेळी ४०० च्या आसपास आंदोलकांना ताब्यात घेऊन या इमारतीमधील नुकसान थांबविले.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
rohit pawar and udayanraje bhosale
साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”
What Sanjay Raut Said About Amit Shah?
“अमित शाह देशाचे गृहमंत्री नसते तर जय शाह… “, घराणेशाहीच्या आरोपावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
pimpri chinchwad marathi news, ncp both factions aggressive in pimpri chinchwad marathi news, rohit pawar sunil tatkare marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक

आणखी वाचा – Brazil Riots: ‘हा तर लोकशाहीवर हल्ला’, ब्राझीलच्या आंदोलनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली खंत

आंदोलनाचे व्हिडिओ पहा –

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची टीका

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर टीका केली. ट्विट करत बायडेन म्हणाले की, ब्राझीलमधील लोकतांत्रिक संस्थांना आमचे पूर्ण समर्थन आहे. लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होत असताना त्यावर झालेला हल्ला हा निषेधपूर्ण आहे. ब्राझीलमधील लोकांच्या इच्छेला असे आव्हान देता येणार नाही. आम्ही राष्ट्रपती लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांच्यासोबत काम सुरु ठेवू.

हेही वाचा – Senegal Bus Accident : सेनेगलमध्ये दोन बसेस समोरासमोर धडकल्या, ४० जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

जैर बोल्सोनारो यांनीही दिली प्रतिक्रिया

बोल्सोनारो यांच्यावर हिंसा भडकविण्याचा आरोप होत असताना त्यांनी ट्विट करत आपली बाजू मांडली आहे. “माझ्यावर केलेले आरोप माल मान्य नाहीत. वर्तमान राष्ट्रपतींनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. “