व्लादिमिर पुतिन यांचा तालिबानला थेट इशारा; म्हणाले, “अफगाणिस्तानने शेजारच्या देशांसाठी…”

रशियाकडून तालिबानची पाठराखण केली जात असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या वेळोवेळी पुढे येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर पुतिन यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

BRICS Summit russian president Vladimir Putin Warns Taliban
१३ व्या ब्रिक्स परिषदेत ते बोलत होते. (प्रातिनिधिक फोटो रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी १३ व्या ब्रिक्स संमेलनामध्ये अफगाणिस्तानमधील सत्तांतरणासंदर्भात भाष्य केलं आहे. पुतिन यांनी तालिबानला थेट इशारा देताना अफगाणिस्तानने आपल्या शेजराच्या देशांठी धोका निर्माण करता कामा नये असं म्हटलं आहे. त्यांनी, “शेजारच्या देशांसाठी दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गोष्टींचा धोका अफगाणिस्तानने निर्माण करता कामा नये,” अशा शब्दांमध्ये पुतिन यांनी अफगाणिस्तानला आणि पर्यायाने तालिबानला इशारा दिलाय.

“अमेरिकन लष्कर आणि त्यांच्या सहकारी देशांचं लष्कर अफगाणिस्तानमधून परतल्यानंतर देशामध्ये पुन्हा एक संकट निर्माण झालं आहे. अफगाणिस्तानमधील या सत्तासंघर्षाचा जगावर आणि अफगाणिस्तान भाग असणाऱ्या क्षेत्रावर कशाप्रकारे परिणाम होणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही. आम्ही सर्व देशांनी या मुद्द्यावर विशेष लक्ष दिलं आहे,” असं पुतिन म्हणाले.

रशियाकडून तालिबानची पाठराखण केली जात असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या वेळोवेळी पुढे येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांचं हे तालिबानला इशारा देणारं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. रशियाबरोबरच चीनकडूनही तालिबानला समर्थन देणारी वक्तव्य आणि कृती करण्यात येत असल्याचे संकेत मिळतायत. पाकिस्तानने तर उघडपणे तालिबानला पाठिंबा जाहीर केलाय. अशा परिस्थितीमध्ये पुतीन यांचं वक्तव्य हे तालिबान आणि त्यांची स्थापन केलेल्या सरकारच्या दृष्टीकोनातून फारच महत्वाचे आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ व्या ब्रिक्स शिखर संम्मेलनाचं अध्यक्षपद भुषवलं. मोदींनी बैठकीमध्ये बोलताना, “नुकतचं ब्रिक्स डिजिटल हेल्थ संम्मेलनाचे आयोजन करण्यात आलं होत. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्यविषयक सेवा पुरवण्यासाठी हा एक आधुनिक मार्ग आहे. नोव्हेंबरमध्ये आपले जलसंवर्धन मंत्री ब्रिक्स फॉरमॅटअंतर्गत पहिल्यांदाच एकमेकांना भेटतील. आपण ब्रिक्स काऊण्टर टेररिझम अॅक्शन प्लॅन म्हणजेच दहशतवादविरोधी कृती आराखडाही तयार केलाय.,” अशी माहिती दिली.

“पहिल्यांदाच असं झालं आहे की ब्रिक्सने मल्टीलॅटरल सिस्टीमच्या सक्षमीकरणासाठी आणि सुधारणेसाठी एकत्र येऊन एक भूमिका मांडलीय. आपण ब्रिक्स काऊण्टर टेररिझम अॅक्शन प्लॅन म्हणजेच दहशतवादविरोधी कृती आराखडाही स्वीकारला आहे. मागील दीड दशकांमध्ये ब्रिक्सने अनेक गोष्टी मिळवल्या आहेत,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ब्रिक्सच्या वाटचालीचा आढावा मांडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Brics summit russian president vladimir putin warns taliban scsg