scorecardresearch

Premium

‘एक आरोप सिद्ध झाला, तरी फाशी घेईन’ब्रिजभूषण सिंह यांचे कुस्तीगिरांना आव्हान

आपल्यावर करण्यात आलेला एक आरोप जरी सिद्ध झाला, तरी मी स्वत:ला फाशी लावून घेईन, असे खुले आव्हान भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीगिरांना दिले आहे.

Brijbhushan Singh
(ब्रिजभूषण सिंह)

पीटीआय, बाराबंकी (उत्तर प्रदेश)

आपल्यावर करण्यात आलेला एक आरोप जरी सिद्ध झाला, तरी मी स्वत:ला फाशी लावून घेईन, असे खुले आव्हान भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीगिरांना दिले आहे. सर्व कुस्तीगीर हे आपल्या मुलांसारखे असून त्यांच्या यशामध्ये आपले रक्त आणि घाम कारणी लागल्यामुळे त्यांना दोष देत नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

महिला कुस्तीगिरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करून पदकविजेते कुस्तीगीर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट जंतरमंतर येथे निदर्शने करीत होते. मात्र रविवारी नव्या संसद भवनावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी या कुस्तीगीरांना ताब्यात घेऊन त्यांचे जंतरमंतरवरील सामान हटविले. त्यानंतर मंगळवारी शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आपली पदके गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीगिरांनी मागे घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सिंह यांनी बाराबंकी येथील एका कार्यक्रमात आपण निर्दोष असल्याचा पुन्हा एकदा दावा केला. ‘‘गेल्या अनेक महिन्यांपासून मला फासावर चढविण्याची त्यांची इच्छा आहे. पण सरकार मला फाशी देत नाहीये. त्यामुळे ते आपली पदके गंगेमध्ये टाकण्यासाठी गेले. गंगेमध्ये पदके फेकल्याने ब्रिजभूषणला फाशी होणार नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते न्यायालयाला द्या. न्यायालय मला फाशी देईल आणि ते मला मान्य असेल,’’ असे सिंह म्हणाले.

सर्व कुस्तीगीर मला मुलांसारखे आहेत. काही दिवसांपूर्वी ते मला कुस्तीमधील देव मानत होते. मी संघटनेचा अध्यक्ष होण्यापूर्वी भारत २०व्या स्थानी होता. आज, माझ्या मेहनतीमुळे पहिल्या पाच संघांमध्ये भारतीय कुस्तीची गणना होते. भारताला कुस्तीमधील सातपैकी पाच पदके माझ्या कार्यकाळात मिळाली आहेत. माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत.-ब्रिजभूषण शरण सिंह, मावळते अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brijbhushan singh challenges wrestlers about allegation amy

First published on: 01-06-2023 at 02:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×