इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ब्रिटन सरकारने भारतीयांसाठी दरवर्षी ३००० व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी यामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

ब्रिटन सरकारने या योजनेचा फायदा मिळणारा भारत पहिला देश असल्याचं सांगितलं आहे. या निर्णयामुळे युके-भारत यंग प्रोफेशनल स्कीमवर शिक्कामोर्तब झालं असल्याचं ब्रिटन सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी १८ ते ३० वयोगटातील ३००० प्रशिक्षित तरुण दोन वर्षांसाठी ब्रिटनमध्ये वास्तव्य आणि नोकरी करु शकतात.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
Cyber Crime
कंबोडियात पाच हजार भारतीयांवर सायबर अत्याचार, ५०० कोटींची फसवणूक, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात!

या योजनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास ब्रिटन सरकारने व्यक्त केला आहे. तसंच दोन्ही देशांची अर्थव्यवस्था अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचं दर्शवत असल्याचंही सांगितलं आहे.

भारताची ऊर्जासुरक्षा जगासाठी महत्त्वाची; जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ठाम प्रतिपादन

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांच्या तुलनेत ब्रिटनचे भारताशी सर्वात चांगले संबंध असल्याचंही ब्रिटनने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. तसंच भारतीय गुंतवणुकीमुळे ब्रिटनमधील ९५ हजार लोकांना रोजगार मिळाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

जी-२० परिषदेत मोदी आणि सुनक यांची भेट

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यापासून भारतीय आनंद व्यक्त करत आहेत. त्यामुळेच त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हा चर्चेचा विषय ठरला. जी-२० परिषदेत दोन्ही नेते पहिल्यांदाच भेटले. याआधी मोदींनी फोन करुन त्यांना पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुनक यांना शुभेच्छा दिल्या होत्या.