लंडन : युक्रेनला लष्करी सामग्रीचा पुरवठा वाढवावा असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले असून, स्वत: ब्रिटन युक्रेन सरकारला आणखी हजारो क्षेपणास्त्रे पाठवणार आहे.
‘नाटो’ आणि जी-७ च्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी जॉन्सन ब्रसेल्सला जात आहेत. या भेटीत ते ब्रिटनकडून दिल्या जाणाऱ्या नव्या मदतीचे आणखी तपशील देण्याची अपेक्षा आहे. यात रणगाडाविरोधी आणि अत्यंत स्फोटक शस्त्रांचा समावेश असलेल्या आणखी ६ हजार क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ‘युक्रेनला लष्करी व आर्थिक मदतीत वाढ करण्यासाठी, तसेच त्यांची संरक्षण फळी बळकट करण्यासाठी ब्रिटन आपल्या मित्रांसह प्रयत्न करेल’, असे जॉन्सन म्हणाले. ब्रिटनने यापूर्वीच ४ हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे युक्रेनला पाठवली आहेत.