हिंदू बॉयफ्रेन्डला गोमांस पाठवून त्रास देणाऱ्या ब्रिटिश शीख तरुणीला तुरुंगवास

पीडित कुटुंबावर वर्णद्वेषी टिपण्णीही करीत होती, त्यातच तिने गोमांस असलेले एक पाकिट या कुटुंबाच्या घराच्या दारामध्ये ठेवले. या प्रकारामुळे या कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या एक्स बॉयफ्रेन्डला त्रास देण्यासाठी त्याच्या घरी गोमांस पाठवून देणाऱ्या एका ब्रिटिश शीख तरुणीला लंडनमधील स्थानिक कोर्टाने २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. पीडित कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे, आपल्या हिंदू एक्स बॉयफ्रेन्ड आणि त्याच्या कुटुंबाला अमनदीप मुधार नामक ब्रिटिश शीख तरुणी अनेक प्रकारे त्रास देत होती. पीडित कुटुंबावर वर्णद्वेषी टिपण्णीही करीत होती, त्यातच तिने गोमांस असलेले एक पाकिट या कुटुंबाच्या घराच्या दारामध्ये ठेवले. या प्रकारामुळे या कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या प्रकरणी कोर्टात खटला दाखल झाल्यानंतर सुनावणीदरम्यान अमनदीपवर लावण्यात आलेले आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर स्वीनडान क्राउन कोर्टाने मंगळवारी अमनदीपला वर्णद्वेषी टिपण्णी करुन त्रास दिल्याबद्दल दोषी ठरवले आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

शिक्षा सुनावताना अमनदीप मुधारला उद्देशून न्या. रॉबर्ट पावसोन म्हणाले, धार्मिक पार्श्वभूमीचा विचार करताना लोक सर्वसाधारणपणे आपल्या सारख्या लोकांचाच विचार करतात. मात्र, आपल्या प्रकरणात अशी गोष्ट दिसून आली नाही. उलट आपली वागणूक ही भावना भडकावणारी आणि भिती दाखवणारी आहे. अमनदीपने आपल्या एक्स बॉयफ्रेन्डच्या कुटुंबावर वारंवार शाब्दिक वार केले, त्यांच्याविरोधात अपशब्द वापरले, फोन करुन धमक्याही दिल्या तसेच सोशल मीडियातूनही बदनामी केली आहे. आरोपी २६ वर्षीय अमनदीप आणि पीडित तरुणाची २०१२ मध्ये मैत्री निर्माण झाली होती. काही काळ ते एकत्र होते मात्र या काळात त्यांच्यात जवळीक निर्माण झाली नाही.

स्थानिक दैनिक स्विनडान एडवरटायझरच्या वृत्तानुसार, सांस्कृतिक भिन्नतेमुळे या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. यानंतर अमनदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी पीडित तरुणाची बहिण आणि आईवर बलात्कारासह त्यांचे घर जाळण्याची धमकी दिली होती. अमनदीपने आपल्या ३० वर्षीय संदीप डोगरा या मित्राच्या मदतीने बॉयफ्रेन्ड आणि त्याच्या कुटुंबावर फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनेक हल्ले केले. त्याचबरोबर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. त्याचबरोबर या कुटुंबाच्या घराबाहेर दरवाजामध्ये गोमांसही ठेवण्यात आले. या प्रकारामुळे या हिंदू कुटुंबाने वैतागून थेट पोलिसांकडे धाव घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: British sikh woman jailed for harassing hindu ex boyfriend with beef

ताज्या बातम्या