लंडन : ‘‘भारतीय लोकशाहीच्या संरचनेवर क्रूर हल्ला होत आहे. देशातील संस्थांवर जोरदार हल्ला होत आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करून भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, ‘इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन’ने आयोजित केलेल्या ‘इंडिया इनसाईट्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी नवी दिल्ली व मुंबईतील ‘बीबीसी’च्या  कार्यालयांचे प्राप्तिकर विभागाने ‘सर्वेक्षण’ केल्याचा संदर्भ दिला. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी होत आहे, याचे हे बोलके उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात विरोधी स्वर उमटूच द्यायचा नाही, या  भाजपच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठीच आपल्याला ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याची प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी
Rohit Pawar, crab
आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा? ‘पेटा इंडिया’ने केली ‘ही’ मागणी