पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन दिसताच BSF कडून गोळीबार

सीमा सुरक्षा दलाच्या ७३ व्या बटालियनने गोळीबार केला

पंजाबमधील अमृतसर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन दिसला आहे. रात्री १२.३० च्या सुमारास शाहपूर बॉर्डर आऊटपोस्टजवळ हा ड्रोन दिसला. यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या ७३ व्या बटालियनने गोळीबार सुरु केला. यानंतर हे ड्रोन सीमापार पाकिस्तानच्या दिशेने परत गेलं. बीएसएफ आणि सुरक्षा यंत्रणा सध्या संपूर्ण परिसराची छाननी करत आहेत. या ड्रोनच्या सहाय्याने सीमापार करत माल पाठवला असल्याचा संशय आहे.

याआधीही अमृतसर सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर १९ आणि २० ऑक्टोबरच्या रात्री ड्रोन आढळला होता. तेव्हाही बीएसएफने गोळीबार केला होता. बीएसएफने परिसरात शोध घेतला असता १ किलो हेरॉइनच पाकिट सापडलं होतं. याच्याभोवती लोखंडी रिंगदेखील होती असं वृत्त पीटीआयने दिलं होतं.

२७ जूनला जम्मूमध्ये भारतीय हवाई दलाच्या कार्यालयावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. अशाप्रकारे ड्रोन हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ होती. सीमापार करत आलेल्या या ड्रोनच्या सहाय्याने बॉम्बहल्ला केला होता. यामध्ये हवाई दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले होते. तसंच इमारतीचं नुकसान झालं होतं.

गेल्या काही महिन्यात ड्रोनचा वाढता वापर पाहता श्रीनगर आणि जम्मूमधील भारतीय हवाई दलाच्या कार्यालयाबाहेर एनएसजीला तैनात करण्यात आलं आहे. तसंच अँटी-ड्रोन सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bsf opens fire at drone along indo pak border in punjab amritsar sgy

ताज्या बातम्या