बसपाच्या उमेदवाराच्या निधनाने निवडणूक वेळापत्रकात बदल

राजस्थानातील चुरू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराचे निधन झाल्याने या मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगाने बदल केला आहे.

राजस्थानातील चुरू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराचे निधन झाल्याने या मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगाने बदल केला आहे. आता या मतदारसंघात १३ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. चुरू मतदारसंघातून निवडणूक लढविणारे बसपाचे उमेदवार जगदीश यांचे १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे आयोगाला वेळापत्रकात बदल करणे भाग पडले आहे. बसपाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २६ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bsp candidate in churu dies polling likely to be postponed

ताज्या बातम्या