केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमम यांनी शुक्रवारी लोकसभेत २०१९-२० या आर्थिक वर्षचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक नव्या योजना जाहीर केल्या. अर्थसंकल्प झाल्यानंतर काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. पेट्रोल आणि डिझेल महगणार आहे. त्याबरोबर सोनंही माहगणार आहे.

यंदाचा अर्थसंकल्पात सरकारच्या केंद्रस्थानी गाव, शेतकरी आणि गरीब नागरिक असल्याचे सांगितले. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सीमा शुल्कातील वाढ १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीच्या दरांत वाढ होणार आहे.

सोन्याप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्येही वाढ होणार आहे. एक्साइज ड्यूटी प्रतिलिटर एक रूपयाने आणि इन्फास्ट्रचर सेज प्रतिलिटर एक रूपयाने लावण्यात येणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर दोन रूपये वाढ होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

अर्थसंकल्पात अनेक घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत. लघू उद्योजकांना त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अति श्रीमंतांवरचा कर मोदी सरकारने वाढवला आहे. दरम्यान टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. करदात्यांबाबत बोलताना सुरूवातीलाच त्यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. १ रुपया, २ रूपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांचं नाणं आणलं जाणार आहे. अंध व्यक्तींना ही नाणी ओळखता येतील अशा प्रकारची नाणी असणार आहेत अशीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात त्याबाबत नाराजी पाहण्यास मिळाली आज सकाळी ११२ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स बजेटनंतर ३३४ अंकांनी कोसळला आहे.