बंडखोराच्या बीमोडासाठी बुरुंडीच्या लष्कारांची कारवाई

बुरुंडीच्या लष्कराने ७९ शत्रूंचा खात्मा केल्याला दजोरा देताना या कारवाईत आठ लष्कराचे जवान मारले

बुरुंडीच्या लष्कराने ७९ शत्रूंचा खात्मा केल्याला दजोरा देताना या कारवाईत आठ लष्कराचे जवान मारले गेल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारी राजधानीच्या रस्त्यावर विखुरलेल्या मृतदेहाच्या, या संहारक कारवाईचे वर्णन लष्कराने महिन्यातील भयंकर रक्तपात झालेला सर्वात अशांत दिवस असे केले आहे.
लष्कराच्या तीन ठिकाणांना अज्ञातांनी आत्मघाती हल्ला करून लक्ष्य केल्यानंतर प्रतिउत्तरादाखल लष्कराला उग्र कारवाई करणे भाग पडले होते. लष्कराचे प्रवक्ता कर्नल बरातुजा यांनी शनिवारी झालेल्या कारवाईत ७९ शत्रू मारल्याचे, ४५ जणांना पकडल्याचे आणि ९७ शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती दिली. तर पोलीस आणि लष्कराचे आठ लोक मारल्याचे, तर २१ जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.शनिवारी लष्कराची दोन ठिकाणे आणि प्रशिक्षण केंद्रावरील हल्ल्यात १२ बंदूकधारी बंडखोरांना मारल्याचे तर २१ जणांना अटक केल्याचे म्हटले आहे.कारवाईवेळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि लष्कराने राजधानी बुजुंबुरातील घराघरात शिरून युवकांना बाहेर खेचून कारवाई केली. लष्कराचे प्रवक्ता कर्नल बरातुजा यांनी कारवाईचे समर्थन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Burundi army kill 79 peopels

ताज्या बातम्या