Premium

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी

बस दरीत कोसळून जम्मूमध्ये भीषण अपघात झाला आहे.

bus Accident in Jammu
५५ लोक या अपघातात जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून १० प्रवासी ठार झाले आहेत. तर ५५ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते अशी माहितीही समोर येते आहे. अशात या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. हे प्रवासी अमृतसरहून वैष्णो देवीच्या दर्शनाला चालले होते त्याचवेळी हा अपघात झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी माहिती दिली की या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला आहे तर ५५ लोक जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. जे जखमी झाले आहेत त्या सगळ्यांना जम्मूच्या सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधी २१ मे रोजीही जम्मूमध्ये बसचा अपघात झाला होता. त्यावेळी एका महिलेचा मृत्यू आणि २४ जण जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा असाच एक अपघात झाला आहे. पोलीस आणि मेडिकल पथकंही घटनास्थळी पोहचले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 10:57 IST
Next Story
Wrestlers Protest :”आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…” व्हिडीओ पोस्ट करत साक्षी मलिकनं काय सांगितलं?