उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झालं होतं. बस ५०० मीटर खोल दरीत पडल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ घडली आहे. येथील रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणाऱ्या एका दरीत ही बस कोसळली. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याने १० जणांचा मृत्यू, १८ जण अजूनही बेपत्ता; लष्कर आणि ITBP कडून बचावकार्य सुरु

प्रांताधिकारी सदर प्रेमलाल टम्टा यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला. धुमाकोट आणि रिखनिखल पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही टम्टा यांनी दिली होती. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus carrying 50 people fell into valley terrible accident in uttarakhand rmm
First published on: 04-10-2022 at 22:45 IST