एका व्यावसायिकाने पंचतारांकित हॉटेलच्या गच्चीवरुन एका मुलाला ढकलून दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. प्री वेडिंग पार्टी सुरु असताना ही घटना घडली आहे. पंचतारांकित हॉटेलच्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.

कुठे घडला प्रकार?

उत्तर प्रदेशातल्या बरेली या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. सार्थक अग्रवाल असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याला गच्चीवरुन ढकलण्यात आलं आहे. व्यावसायिकाने रागाच्या भरात सार्थकला गच्चीवरुन ढकलून दिलं. या घटनेत सार्थक गंभीर जखमी झाला आहे. त्याला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. प्री वेडिंग पार्टीसाठी तो आला होता. त्यावेळी पार्टी सुरु असताना सार्थक अग्रवाल आणि व्यावसायिक यांचं भांडण सुरु झालं त्यातून ही घटना घडली.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसतं आहे?

सार्थक अग्रवाल आणि त्याचा मित्र रिदीम अरोरा यांच्यात भांडण सुरु झालं. यांच्यात भांडण सुरु झालं. ही वेळ पहाटे २ ची आहे. त्यानंतर जोरदार मारामारी झाल्याचं दिसतं आहे. रिदीमने त्याचे वडील संजीव अरोरा यांना हॉटेलमध्ये बोलवून घेतलं. संजीव अरोरा पोहचण्याआधी दोन गटांची बाचाबाची सुरु होती. संजीव अरोरा तिथे येताच सार्थक अग्रवाल यांच्या पाया पडतो असं दिसतं. मात्र ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी सार्थकची कॉलर पकडली आणि कानाखाली मारण्यास सुरुवात केली. मारत त्याला गच्चीच्या कडेला नेलं आणि ढकलून दिलं. हे पाहिल्यावर काहीजण सार्थकचं काय झालं ते पाहण्यासाठी धाव घेतात.

हे पण वाचा- नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”

संजीव अग्रवाल इतकं करुनही थांबले नाहीत हे देखील फुटेजमध्ये दिसतं. ते दुसऱ्या तरुणाकडे वळतात त्याला मारहाण सुरु करतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसते. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आरोपी दारुच्या नेशत होते, कुणीही चिथावणी दिलेली नसताना हा हल्ला झाला आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीर नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.