एक्स्प्रेस वृत्त, रितू सरीन, जतिन आनंद

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना ते राहत असलेल्या ६, फ्लॅग स्टाफ रोड, या त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी ३३ कोटी ६६ लाख रुपये खर्च आल्याचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात नमूद करण्यात आले आहे. या निवासस्थानात बदल करताना बांधकाम विभागाने काही अनियमितता केली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालाच्या आधारे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, या कार्यालय व बंगल्याच्या सजावटीचा प्राथमिक अंदाजे खर्च ७.९१ कोटी इतका होता, मात्र हे काम पूर्ण झाले तेव्हा एकूण खर्च ३३ कोटींपेक्षा जास्त खर्च झाला होता. निवासस्थान आणि कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) देण्यात आले होते. हा अहवाल अद्याप दिल्ली विधानसभेसमोर मांडलेला नाही. त्यामध्ये सल्लागारांची संशयास्पद निवड, अंदाजित खर्चात वारंवार बदल आणि मंजुरीपेक्षा अधिक खर्च करणे हे मुद्दे मांडण्यात आले आहेत. विभागाला २०२०मध्ये दिलेल्या प्रस्तावानुसार सजावटीसाठी खर्च वाढून ८.६२ कोटी इतका अपेक्षित होता. प्रत्यक्षात ‘पीडब्ल्यूडी’ने २०२२मध्ये काम पूर्ण केले तेव्हा एकूण खर्च ३३ कोटी ६६ लाख रुपये इतका खर्च झाला होता. महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांनी हा अहवाल तयार केला आहे. त्यांनी पद सोडण्याच्या केवळ एक आठवडा आधी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी या अहवालावर सही केली होती, अशी माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.

हेही वाचा >>>OYO रुमध्ये आता अविवाहित जोडप्यांना ‘नो एंट्री’; नव्या वर्षात नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

मद्या घोटाळ्यात केजरीवाल यांची सप्टेंबर २०२४मध्ये जामिनावर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, त्यांनी १७ सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर २०२४मध्ये नूतनीकरण केलेले निवासस्थान रिकामे केले.

भाजपचे लक्ष वळवण्याचे डावपेच’

हा अहवाल म्हणजे भाजपचे लक्ष्य दुसरीकडे वळवण्याचे डावपेच असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. जो नेता २,७०० कोटींच्या घरात राहतो, ८.४०० कोटींच्या विमानातून फिरतो, १० लाख रुपयांचे सूट परिधान करतो तो नेता बांधकाम विभागाने बांधलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबद्दल बोलतो हे विसंगत आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली.

हेही वाचा >>>PM Modi on Kejriwal: केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानावर ३३ कोटींचा खर्च; इंडियन एक्सप्रेसच्या बातमीचा हवाला देत पंतप्रधान मोदींची टीका

मोदींची केजरीवालांवर टीका

इंडियन एक्स्प्रेसने रविवारी यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांना लक्ष्य केले. दिल्लीच्या रोहिणी भागात भाजपच्या परिवर्तन सभेत बोलताना ते म्हणाले की, ‘आप’च्या नेत्यांना दिल्लीच्या जनतेची किंवा विकासाची चिंता नाही.

आज एका मोठ्या वर्तमानपत्राने शीशमहलावर झालेल्या खर्चाबद्दल लिहिले आहे. तुम्हाला हे जाणून वेदना होतील की जेव्हा लोक कोविडचा सामना करत होते, औषधे आणि ऑक्सिजनसाठी धावपळ करत होते तेव्हा आपचे संपूर्ण लक्ष शीशमहल बांधण्याकडे होते. नरेंद्र मोदीपंतप्रधान

अंदाजापेक्षा तिप्पट खर्च (रुपयांत)

● पडदे – ९६ लाख

● स्वयंपाकघर उपकरणे-३९ लाख

● टीव्ही फर्निचर – २०.३४ लाख

● ट्रेडमिल, जिम्नॅशियमची उपकरणे – १८.५२ लाख

● रेशमी गालिचे – १६.२७ लाख

● मिनीबार – ४.८० लाख

● भिंतीसाठी संगमरवर – ६६.८९ लाख

● जमिनीच्या टाइल – १४ लाख

● बांधकाम क्षेत्रात ३६ टक्के वाढ

● पडदे – ९६ लाख

● स्वयंपाकघर उपकरणे-३९ लाख

● टीव्ही फर्निचर – २०.३४ लाख

● ट्रेडमिल, जिम्नॅशियमची उपकरणे – १८.५२ लाख

● रेशमी गालिचे – १६.२७ लाख

● मिनीबार – ४.८० लाख

● भिंतीसाठी संगमरवर – ६६.८९ लाख

● जमिनीच्या टाइल – १४ लाख

● बांधकाम क्षेत्रात ३६ टक्के वाढ

Story img Loader