इजिप्तची राजधानी कैरोमध्ये एका चर्चला लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. इंबाबाच्या वर्दळीच्या भागात असलेल्या अबू सेफीन चर्चला ही आग लागली असून या आगीत चर्चचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा- राकेश झुनझुनवालांच्या निधनानंतर रतन टाटांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “झुनझुनवाला हे…”

रविवारी सकाळच्या सुमारास इंबाबा जिल्ह्यातील अबू सेफीन चर्चमध्ये प्रार्थनेसाठी पाच हजार लोक जमले होते. त्यावेळी चर्चला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – Har Ghar Tiranga: राष्ट्रध्वजाच्या रंगांनी रंगली कार, ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी युवकाचा सुरत ते दिल्ली प्रवास

दरम्यान, राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पोप तावाड्रोस यांच्याशी फोनवर चर्चा करून माहिती घेतली. तसेच त्यांनी फेसबुट पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांबाबत संवेदना व्यक्त केल्या. ”मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. सर्व यंत्रणांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.”, असेही ते म्हणाले.