सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जेल नाही बेल म्हणजेच तुरुंगवास नाही जामीन या मुद्द्यावर जोर देताना कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, असं कारण देत अनिश्चित कालावधीसाठी तुरुंगामध्ये ठेवता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला केवळ शक्यतेच्या आधारावर अनिश्चित कालावधीसाठी तुरुंगामध्ये डांबून ठेवता येणार नाही, असं स्पष्ट करताना यामध्ये तपास यंत्रणांकडून मोठ्या कटाची योजना या कारणाखाली पुराव्यांशिवाय शक्यतांच्या आधारे एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येणार नाही असं म्हटलंय. हा निकाल न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सीमेपलीकडून पशू तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मोहम्मद इनामुल हकला जामीन मंजूर करताना दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय?
केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणामध्ये बीएसएफच्या एका कमांडरलाही त्याच्या कथित सहभागासाठी अटक केली होती. या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार पशू तस्करीमधून मिळालेले पैसे कथित पद्धतीने राजकीय पक्ष आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी या नियोजित कटाची चौकशी प्रलंबित असून ती सुरु आहे, असं न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्या. चंद्रचूड आणि न्या. माहेश्वरी यांनी, ही अशी कोणती चौकशी केली जातेय जी आम्हाला समजत नाहीय, असा प्रश्न विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can not keep someone in jail indefinitely over national security fears supreme court scsg
First published on: 25-01-2022 at 10:35 IST