काही दिवसांपूर्वी भारत सरकारने कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये कॅनडात घडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता कॅनडा सरकारने भारतात येणाऱ्या कॅनडाच्या नागरिकांना अजब सल्ला दिला आहे. भारतातील काही राज्यांची यादी कॅनडानं दिली असून या राज्यांमध्ये कॅनडाच्या नागरिकांनी प्रवास करू नये, अशा सूचना कॅनडाच्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, यासाठी सुरक्षेचं कारण देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतानं का दिला काळजीचा सल्ला?

“गेल्या काही दिवसांमध्ये कॅनडाममध्ये द्वेषातून होणारे गुन्हे, सामाजिक हिंसाचार आणि भारतीयांविरोधातील कारवायांमध्ये वाढ झाली आहे. भारत सरकार आणि कॅनडातील भारतीय दूतावासाने या घटनांची दखल घेऊन कॅनडा सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे”, असं भारतीय परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “हल्ल्यांच्या या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कॅनडातील भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि कॅनडात जाण्याच्या तयारीत असलेल्या भारतीयांनी सतर्क राहावं”, अशी सूचना परराष्ट्र खात्यानं दिली आहे.

रस्त्यावर फिरणारे शार्क, पत्रकार उडून जाता जाता वाचला; २४० किमी वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकलं ‘इयान’ चक्रीवादळ

दरम्यान, या सूचनेनंतर आता कॅनडा सरकारनं भारतात येणाऱ्या त्यांच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नव्हे, तर भारतातील काही राज्यांची यादी देऊन या राज्यांमध्ये कॅनेडीय नागरिकांनी जाऊ नये, असं देखील सांगण्यात आलं आहे. ही राज्य पाकिस्तान सीमारेषेवरची असून या राज्यांमध्ये सुरक्षेचा मुद्दा असल्यामुळे हे निर्देश देण्यात येत असल्याचं कॅनडानं आपल्या नागरिकांना सांगितंल आहे. एनडीटीव्हीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

भूसुरुंग आणि सुरक्षेचा प्रश्न?

आपल्या नागरिकांना सूचना देताना कॅनडानं या भागात भूसुरूंग आणि सुरक्षेचा प्रश्न असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. “भारतातील पाकिस्तानच्या सीमेवरील पुढील राज्यांमध्ये प्रवास करणं टाळावं. सीमाभागापासून १० किलोमीटरच्या परिसरात फिरू नये. या भागातील सुरक्षेबाबतची अनिश्चितता आणि भूसुरूंगांची शक्यता लक्षात घेता कॅनेडीय नागरिकांनी काळजी घ्यावी”, असं या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

कोणत्या राज्यांचा सूचनेत उल्लेख?

या राज्यांमध्ये पाकिस्तानला सीमा लागून असलेले गुजरात, पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांचा समावेश आहे. त्यासोबतच, आसाम आणि मणिपूरमध्येही अंतर्गत संघर्षाच्या शक्यतेमुळे प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, लडाखला मात्र या यादीतून वगळण्यात आलं आहे.

More Stories onकॅनडाCanada
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada alerts its citizens dont travel in india bordering pakistan states pmw
First published on: 29-09-2022 at 12:38 IST