“…त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द केलं पाहिजे”, पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांबद्दल भाजपा नेत्याचं विधान

जम्मू-काश्मीरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते विक्रम रंधावा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

indians cheering for match

नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकाच्या सामन्यात ज्यांनी पाकिस्तानचा भारताविरुद्धचा विजय साजरा केला त्यांना केवळ मारहाण न करता त्यांचे भारतीय नागरिकत्वही रद्द करण्यात यावे, असे जम्मू-काश्मीर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विक्रम रंधावा एका व्हिडिओमध्ये कथितपणे म्हणताना ऐकू येत आहेत. त्यांचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये, ते कथितरित्या मुस्लिमांना “रस्ते अडवण्याऐवजी” व्हॉट्सअॅपवर नमाज अदा करण्यास सांगत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजात तीव्र निषेध व्यक्त होत असून, अनेक प्रमुख लोक त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांकडे आले आहेत, रंधावा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की व्हिडिओ चुकीच्या संदर्भात त्यांची टिप्पणी सादर करण्यासाठी तयार करण्यात आला होता. आपल्या नमाज टिप्पणीबद्दल, त्यांनी दावा केला की हे वास्तवात काश्मिरी मुस्लिमांविरुद्ध पाकिस्तानी पत्रकाराचे विधान आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते सुनील सेठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रंधावा यांच्या वक्तव्यापासून पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, रंधावा यांनी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार टिप्पणी केली असावी. “आम्हाला सर्व क्षेत्रांसाठी सर्वसमावेशक वाढ हवी आहे,” ते म्हणाले. “आमच्यासाठी जम्मू-काश्मीरमधील सर्व प्रदेशातील लोक तितकेच महत्त्वाचे आहेत आणि आम्हाला संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात शांतता आणि प्रगती हवी आहे.”
जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंदन कोहली म्हणाले की, “या प्रकरणाची दखल घेतली जात आहे”. पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “काश्मिरींचा नरसंहार करणार्‍या आणि त्यांची कातडी सोलण्याचं आवाहन करणार्‍या माजी आमदारावर कोणतीही कारवाई केली जात नाही”.

व्हिडिओमध्ये, रंधावा कथितपणे म्हणत आहेत, “या २२- किंवा २३ वर्षांच्या मुली, ज्या जम्मूमध्ये बुरखा घालून फिरत होत्या, काश्मीरमध्ये त्यांची जॅकेट हवेत फेकत होत्या आणि पाकिस्तान समर्थक घोषणा देत होत्या. आणि २१-२२ वयोगटातील या मुली पाकिस्तानचे कौतुक करत आहेत आणि त्यांच्या मनात त्याबद्दल सहानुभूती आहे.”

“अशा प्रकारात सामील असलेल्या सर्वांना मारहाण करून कातडी सोलली पाहिजे. त्यांच्याशी अशी वागणूक द्यायला हवी की त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही भारतीय भूमीवर भारतविरोधी नारे किंवा पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचा परिणाम आठवेल,” ते म्हणतात. “फक्त त्यांनाच नाही, तर त्यांच्या पालकांनाही हे लक्षात आले पाहिजे की त्यांनी कोणत्या कृतघ्न मुलांना जन्म दिला आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cancel citizenship of those who cheered for pak jammu bjp leader vsk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या