इमरान खान यांना भेटायला बायडेन यांच्याकडे वेळ नाही? व्हाईट हाऊसकडून स्पष्टीकरण, म्हणाले,…

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ह्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कधी भेटणार याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.

Imran Khan

काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस इथं भेट घेतली. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचीही ज्यो बायडेन भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कधी याबद्दल व्हाईट हाऊसकडूनही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. व्हाईट हाऊसचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, त्यांना या चर्चेबद्दल कोणताही अंदाज वर्तवता येत नाही.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यान उच्चस्तरीय चर्चा करण्याचं नियोजन आहे. मात्र इमरान खान यांनी सांगितलं की, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन सध्या आपल्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांच्याशी बोलणं होऊ शकलेलं नाही. अफगाणिस्तानातल्या परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत हवी असल्याने हा संवाद होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेन साकी यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, बायडेन आणि खान यांच्यात काही चर्चा होणार आहे की नाही, याबद्दल आम्हाला काहीही अंदाज नाही. जर काही चर्चा झाली तर निश्चितच माध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cant say when president biden will talk to pak pm imran khan vsk

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी