युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त समजल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी शुक्रवारी दिली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतर मोहिमेसाठी सिंह सध्या पोलंडमध्ये गेले आहेत.

सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की कीव्हमधून स्थलांतर करणारा एक विद्यार्थी गोळीबारात जखमी झाल्याचे वृत्त आम्हाला समजले आहे. युद्धात अशा घटना घडतातच.

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Satyam Surana
पंतप्रधान मोदींचे समर्थन केल्यामुळं युकेमध्ये भारतीय विद्यार्थ्याची हेटाळणी
Cheistha Kochhar Accident
लंडनमध्ये PHD करणाऱ्या भारतीय विद्यार्थिनी चेइस्ता कोचर यांना ट्रकने चिरडलं, अपघातात मृत्यू

 १ मार्च रोजी कर्नाटकचा रहिवासी नवीन एस. जी. हा युक्रेनच्या खारकीव्ह शहरात आपल्या सहकारी विद्यार्थी मित्रांसाठी खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी बाहेर पडला असताना बाँबहल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना घडली होती.

सिंह म्हणाले, की कुठलीही हानी न होता अधिकाधिक विद्यार्थी युक्रेनच्या बाहेर स्थलांतरित करण्यावर भारत सरकारचा भर आहे. आपण युक्रेनच्या पश्चिम सीमेवरील रोमानिया, हंगेरी, पोलंडमधून विशेष विमानांनी भारतीय नागरिकांना मायदेशी आणत आहोत. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनची हवाई वाहतूक २४ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली आहे.