Caronavirus: …म्हणून आम्ही जगभरामध्ये प्रिमियम कंटेंट मोफत देत आहोत; ‘पॉर्न हब’ची घोषणा

इटली, स्पेन, फ्रान्सपाठोपाठ संपूर्ण जगातच सेवा मोफत देणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे

चीनसह जगभरामध्ये थैमान घालण्याऱ्या करोना विषाणूमुळे देशभरातील अनेक देशांनी महत्वाच्या शहरांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. अगदी इटली, फ्रान्स, स्पेनपासून ते भारतापासून अगदी आफ्रिका खंडातील देशांनाही करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना घरीच बसावं लागतं आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर पॉर्न हब या पॉर्न वेबसाईटने जगभरामध्ये आपला प्रिमियम कंटेट मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या ओपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच घोषणा कंपनीने केवळ इटलीपुरती केली होती. मात्र आता जगभरात प्रिमियम कंटेटं मोफत देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

आधी इटलीमध्ये केली घोषणा

काही आठवड्यांपासून इटलीमध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान गिसीपी काँटे यांनी सर्व देशामध्ये शटडाउनची म्हणजेच बंद करण्याची घोषणा केली आहे. महत्वाचा प्रवास वगळता इतर प्रवासांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या इशाऱ्यांकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने सरकारने सक्तीची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्बंधांमुळे इटलीतील दोन तृतीयांश भागातील सहा कोटी जनतेला घरी बसण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. याच पार्श्वभूमीवर पॉर्न हबने १२ मार्च रोजी इटलीमध्ये आपला प्रिमियम कंटेट मोफत देण्याची घोषणा केली. “तुम्हाला घरी वेळ घालवता यावा म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या साईटवरील प्रिमियम कंटेंट मोफत देणार आहोत. त्यामुळे आता क्रेडिटकार्डवरुन तुम्हाला कंटेंट पाहण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही,” असं कंपनीने आपल्या पत्रकामध्ये म्हटलं होतं.

नक्की वाचा >> Coronavirus: भारतामध्ये कंडोमचा खप प्रचंड वाढला; विक्रेतेही चक्रावले

इटलीप्रमाणेच स्पेन आणि फ्रान्स

इटलीप्रमाणेच स्पेन आणि फ्रान्सलाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या देशांमधील अनेक भागांमध्ये सक्तीची बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी भटकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आल्याने अनेकंना घरातच बसावं लागत आहे. त्यामुळेच या देशांमध्येही कंपनीने प्रिमियम कंटेंट मोफत देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.

आता जगभरात मोफत

जगभरातील शंभरहून अधिक देशांना करोनाचा फटका बसला असल्याने आता अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने प्रिमियम कंटेटं मोफत देण्याचा निर्णय़ घेतला आहे. जगभरामध्ये आमच्या वेबसाईटवरील प्रिमियम कंटेंट २३ एप्रिल पर्यंत मोफत पाहता येईल, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. आपल्या या निर्णयामुळे लोकं घरी थांबवतील आणि विलगीकरणामध्ये वेळ घालवणं त्यांना सोप्प जा ईल. ज्यामुळे करोनाचा प्रसार होणार नाही, अशी अपेक्षा कंपनीला आहे. आम्ही हे करोना संसर्गाचा आलेख वाढू नये म्हणजेच कर्व्ह फ्लॅट करण्यासाठी करत आहोत असं कंपनीने ट्विटरवर म्हटलं आहे.


सामान्यपणे कंपनीकडून प्रिमियम कंटेंटसाठी ७.९९ डॉलर (अंदाजे ७०० रुपये) ते ९.९९ डॉलर (८०० रुपये) दर महिन्याला आकारले जातात.

नक्की वाचा >> गाडीमध्ये सेक्स करताना आढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई

कंपनीकडून ही सुद्धा मदत…

कंपनीने आपल्या मॉडेलहब साईटवरील कमाईचा काही हिस्सा इटलीला करोनाविरुद्ध लढण्यासाठी निधी म्हणून देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. कंपनीच्या माध्यमातून न्यूयॉर्कमधील आरोग्य श्रेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० हजार मास्कचे वाटप करण्यात आल्याचं न्यूयॉर्क पोस्टने म्हटलं आहे. तसेच जर्मनी, इटली आणि स्पेनमधील सेवाभावी संस्थांना ५० हजार युरोची मदत देण्याचंही कंपनीने ठरवलं आहे.

नक्की वाचा >> साथीचा असाही परिणाम; ‘हे’ Extra Marital App डाऊनलोड करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले

भारतामध्ये पॉर्नहबवर बंदी पण…

२०१८ साली ऑक्टोबर महिन्यात सरकारने पॉर्नहबसह ८५७ पॉर्न वेबसाइट्सवर देशातमध्ये बंदी घातली आहे. मात्र असं असलं तरी देशामध्ये व्हिपीएनद्वारे (व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क) पॉर्न वेबसाइट्स पाहणाऱ्यांचे प्रमाणात तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे डिसेंबर २०१९ मध्ये समोर आलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Caronavirus pornhub premium made free for everyone globally to keep you home scsg