Cast Census : कोव्हिड आल्याने लांबणीवर पडलेली जातनिहाय जनगणना अद्यापही झालेली नाही. आता करोना काळ संपूनही दोन वर्षे झाली आहेत तरीही याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान अशी माहिती समोर येते आहे की मोदी सरकार जातनिहाय जनगणना करण्यासाठी तयार आहे. त्यासाठीचा आरखडाही तयार करण्यात येतो आहे असं कळतं आहे. मात्र अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. आपल्या देशात १८८१ पासून दर दहा वर्षांनी जातनिहाय गणना केली जाते. २०११ नंतर २०२१ मध्ये जातनिहाय जनगणना ( Cast Census ) होणं अपेक्षित होतं. मात्र देशभरात करोना असल्याने हा निर्णय लांबणीवर गेला.

राहुल गांधी काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीपर्यंत जातनिहाय जनगणना ( Cast Census ) मोदी सरकारने पुढे ढकलली. लोकसभा निवडणूक निकालानंतर मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. तरीही जातनिहाय जनगणनेचा निर्णय झाला नाही. आता मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची तयारी सुरु केली आहे असं कळतं आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या मागचं कारण असं आहे की विरोधी पक्षातल्या काँग्रेससह इतर अनेक पक्षांनी जातनिहाय जनगणनेची ( Cast Census ) मागणी लावून धरली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की जातनिहाय जनगणना ( Cast Census ) रोखण्याचा विचार जर मोदी करत असतील तर तो त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता असं होणार नाही की तुम्हाला कुणीही रोखणार नाही. ९० टक्के लोकांना जातनिहाय जनगणना हवी आहे असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. जातनिहाय जनगणनेचा आदेश द्या किंवा पुढच्या पंतप्रधानांना तो निर्णय घेताना पाहा असंही राहुल गांधी म्हणाले.

dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
Chief Justice DY Chandrachud on caste discrimination
SC on Cast Discrimination: ‘स्वातंत्र्यानंतरही आपण तुरुंगातील जातीभेद हटवू शकलो नाही’, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत
Maharashtra state housing policy announced after 17 years Mumbai
निवडणुकीपूर्वी गृहनिर्माण धोरण ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांची घाई
muhammad yunus govt in bangladesh
Bangladesh Durga Puja Festival: ‘नमाजच्या पाच मिनीट आधी पूजेसाठीचे स्पीकर बंद करा’, बांग्लादेशच्या गृह मंत्रालयाचे निर्देश
maharera latest news in marathi
विकासकांकडील वसुलीसाठी ‘महारेरा’कडून लवकरच स्वतंत्र यंत्रणा!
SSC GD Constable 2025
SSC GD Constable 2025 : सरकारी नोकरीची संधी! स्टाफ सिलेक्शन कमीशनद्वारे ३९,४८१ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज

हे पण वाचा- “भाजपा-संघाचे कान धरुन जातनिहाय जनगणना करुन घेऊ”, लालूप्रसाद यादव यांची टीका

भाजपाचे सहकारी पक्षही जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही

फक्त राहुल गांधी किंवा विरोधी पक्षच नाही तर भाजपाचे सहकारी पक्ष आणि त्यांचे नेते म्हणजेच नितीश कुमार, चिराग पासवान यांनीही जातनिहाय जनगणनेची ( Cast Census ) मागणी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याबाबत जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी हेच सूचित केलं की देशातही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. बिहारमध्ये जी जातनिहाय जनगणना झाली त्यानंतर हे लक्षात आलं की राज्यातील ८० टक्के जनता ही अति मागासवर्गातील आहे. त्यामुळेच आता देशभरात जातनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी होते आहे. इतके दिवस या मागणीला विरोध करणाऱ्या मोदी सरकारने दोन पावलं मागे येऊन जातनिहाय जनगणना घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे मात्र निर्णय अद्यापही होणं बाकी आहे.