Latest Basti crime news where a caterer throws a minor boy into a burning tandoor over rasgullas : लग्न सोहळ्यात रसगुल्ले घेतले म्हणून एका केररिंग कामगाराने ११ वर्षांच्या मुलाला पेटलेल्या तंदूरमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात बुधवारी हा भीषण प्रकारानंतर मुलागा चांगलाच भाजला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अज्ञात केटरिंग कामागारविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला उपचारांसाठी लखनौ येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
जखमी झालेल्या मुलाचे नाव चमन असे असून त्याच्या वडिलांचे नाव संतोष आहे. इयत्ता दुसरीत शिकणारा हा पीडित मुलगा मूळचा गोंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आईच्या मृत्यूनंतर चमन हा बस्ती जिल्ह्यातील त्याच्या मामाच्या घरी राहतो आहे.
नेमकं काय झालं?
चमन हा बुधवारी त्याच्या आजीबरोबर गावातील एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याला गेला होता. कार्यक्रमादरम्यान तो जेवणाच्या भागात गेला आणि तेथे ठेवलेले रसगुल्ले उचलू लागला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, केटरिंग ऑपरेटर त्यावेळी तेथे होता आणि चमन वारंवार रसगुल्ले घेत असल्याचे बघून तो प्रचंड संतापला. त्यानंतर आरोपीने चमनला पकडले आणि त्या चिमुरड्याला धमकी दिली. त्यानंतर आरोपी त्याला उचलून जळत्या तंदूरजवळ घेऊन गेला, त्यानंतर मुलाचा तोल गेला आणि चमन तंदूरमध्ये फडला.
मुलाचे किंकाळी ऐकून आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली आणि चमनला तंदूरमधून बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत त्याच्या शरीरावर चेहऱ्यापासून ते छातीपर्यंत गंभीर दुखापत झाली होती.
चमन याला तात्काळ आयोध्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर डॉक्टरांनी त्याची स्थिती बघता त्याला लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून दिले. यादरम्यान आरोपी केटरिंग कामगार घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. चमनच्या मामाने दिलेल्या तक्रारीनंतर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
आगीच्या घटनेत एक मूल भाजल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक स्वर्णिमा सिंग यांनी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सिंगयांनी सांगितले.
