scorecardresearch

Premium

मणिपूरमधील युवक-युवतीच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक; ‘सीबीआय’च्या विशेष पथकाची कारवाई

सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २७ सप्टेंबरपासून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

cbi arrests 4 people in connection murder of two manipuri youth
(संग्रहित छायाचित्र) ;

इम्फाळ : मणिपूरमधील युवक-युवतीचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चार जणांना अटक केली आहे. त्यांना मृत्यूदंडासारखी अधिकात अधिक कठोर शिक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी सांगितले.

 अटक करण्यात आलेल्या चौघा जणांत मुख्य आरोपीच्या पत्नीचाही समावेश आहे. अटक केलेल्यांना विशेष विमानाने राज्याबाहेर नेण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी आधी अकरा वर्षे आणि नऊ वर्षे वयाच्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले होते, पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या दोघीही मुख्य आरोपीच्या मुली आहेत.

chandra shekhar bawankule
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अमृतकाळाचे साक्षीदार होण्यास सज्ज व्हा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
uk pm Rishi Sunaks Adorable Moment With Bangladesh PM Sheikh Hasina At G20
अनवाणी पायांनी गुडघ्यावर बसून बांगलादेशच्या पंतप्रधानांशी केला वार्तालाप; ब्रिटन पंतप्रधानांचा साधेपणा चर्चेत!
narendra modi and President of Brazil Luiz Inacio Lula da Silva
G20 Summit 2023: सुरक्षा परिषदेचा विस्तार करा!; पंतप्रधान मोदी यांची आग्रही मागणी, ‘जी-२०’शिखर परिषदेचा समारोप

हेही वाचा >>> मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुईझ यांची निवड 

 फिजम हेमंजित (२० वर्षे) हा युवक आणि हिजम लिंथोइनगांबी (१७ वर्षे) ही युवती असे दोघेजण ६ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे २५ सप्टेंबरला समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने सुरू केली. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २७ सप्टेंबरपासून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

युवक-युवतीच्या हत्येप्रकरणी सीबीआयने चुराचांदपूर जिल्ह्यातील हेंगलेप भागातून चार जणांना अटक केली आहे. या आरोपींची रवानगी राज्याबाहेर विशेष विमानाने केली आहे. अटकेच्या या कारवाईत लष्कर आणि निमलष्करी दलाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

– एन. बिरेन सिंह, मुख्यमंत्री मणिपूर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cbi arrests 4 people in connection with kidnapping and killing of two manipuri youth zws

First published on: 02-10-2023 at 03:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×