दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सचिव राजेंद्र कुमार यांना सोमवारी सीबीआयकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. २००६ साली झालेल्या ५० कोटींच्या घोटाळ्याचे राजेंद्र कुमार मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह अन्य चारजणांनाही अटक झाली असून या सर्वांना मंगळवारी पातियाळा न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात याप्रकरणी सीबीआयने थेट दिल्लीच्या सचिवालयातील राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयवर टीका केली होती. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असलेल्या अरूण जेटलींना अडचणीत आणणाऱ्या फाईल्स मिळविण्यासाठी सीबीआयने ही धाड टाकल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता.

Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”
ARVIND KEJRIWAL
ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलं; मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशी, आजच अटक होणार?