इशरत जहॉं चकमकप्रकरणी गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रामध्येही गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पुरवणी आरोपपत्रामध्ये गुप्तचर विभागाचे विशेष संचालक राजिंदर कुमार यांच्याव्यतिरिक्त तिघांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. उर्वरित तिघांमध्ये पी. मित्तल, एम. के. सिन्हा आणि राजीव वानखेडे या गुप्तचर विभागातील अधिकाऱयांचा समावेश आहे.