दस्तावेज ताब्यात

pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित नागपुरातील व्यक्तींच्या कार्यालय आणि निवासस्थानासह अन्य १२ ठिकाणी सीबीआयने छापे घातले. ही छापेमारी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

सीबीआयने केलेली ही सातवी कारवाई असल्याचे समजते. मुंबई, दिल्ली आणि नागपुरातील सीबीआयचे जवळपास ५१ अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांनी दहा पथके तयार केली होती. रामदासपेठेतील बाहेती यांच्या घरावर आणि कार्यालयावर, सदरमधील एका सीएच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला.  येथून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी गृहमंत्री देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात ७ कोटींचा व्यवहार झाला होता. त्यासंबंधाने हे छापे टाकण्यात आल्याची चर्चा आहे.   आधी हा व्यवहार ४ कोटींचा असल्याची चर्चा होती. आता ती रक्कम सात कोटी असल्याची माहिती पुढे आली आहे.

सायंकाळपर्यंत कारवाई

कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये  देशमुख यांचे सीए विशाल खटवानी यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात सीबीआयचे पथक धडकले. सीए खटवाणी शेअर ट्रेडिंगशीही संबंधित आहेत. तेथे पथकाने काही महत्वाची कागदपत्रे  ताब्यात घेतली. तपासणीत काही डिजिटल पुरावेही सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे. सकाळी ७ वाजता सुरू झालेली ही कारवाई  सायंकाळपर्यंत सुरू होती.