आता ‘एचएएल’मध्ये लाचखोरीचे वादळ, ७ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा; CBI ची कारवाई

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील सात अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराला जानेवारी ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत पाच कोटी रुपये अदा करण्यास मंजुरी दिली.

(संग्रहित छायाचित्र)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले असून एका कंत्राटदाराला नियम डावलून पाच कोटी रुपये दिल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी रात्री ‘एचएएल’मधील सात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील सात अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराला जानेवारी ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत पाच कोटी रुपये अदा करण्यास मंजुरी दिली. मात्र, ही मंजुरी देताना नियम डावलण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सात दशकांपासून लढाऊ विमान बांधणीचे काम करणारी ‘एचएएल’ राफेल घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे. राफेल खरेदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याची रणनीती आखली आहे. ‘एचएएल’ला पूर्वीच्या करारान्वये मिळणारे कंत्राट मोदी सरकारने रिलायन्सच्या घशात घातले, असा काँग्रेसचा आरोप आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cbi registers case against 7 officials of hindustan aeronautics limited corruption charges

ताज्या बातम्या