केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. यंदाचा निकाल तब्बल ९६.२१ टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल तब्बल ९६.३६ टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ९६.११ टक्के एवढा आहे. सुरूवातीला हा निकाल दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता cbseresults.nic.in. या संकेतस्थळावर निकाल दिसण्यास सुरूवात झाली आहे. याशिवाय,  www.result.nic.in  , http://www.cbse.nic.in या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना हे निकाल पाहता येतील.