केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जुलै अखेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. त्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, सीबीएसई या आठवड्यात १० आणि १२ वीचे निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कुठे आणि कसा पाहता येईल हे आपण जाणून घेऊया.

यावर्षी करोना महामारीच्या दुसर्‍या  लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन योजना स्वीकारली, तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.

विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येतील.

या वेबसाइटवर पाहता येतील निकाल

cbse.nic.in , cbseacademic.nic.in

कसे चेक कराल निकाल

  • सीबीएसईच्या cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • होमपेजवर ‘रिझल्ट’ टॅबवर क्लिक करा
  •  स्क्रीन वर एक नवीन पेज ओपन होईल
  • त्यानंतर पर्याय निवडा
  • त्यानंतर विचारलेले क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल